आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजवर्धन राठोड : मोदींचे नाव घेत सीपी जोशींवर टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - जयपूर ग्रामीण मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेमबाज कर्नल राजवर्धनसिंह राठोड यांच्यासह प्रचारपथक बानसूर येथे पोहोचतो. राजस्थानी साफा बांधून स्वागत झालेले राठोड दुपारी साडेबाराच्या सुमारास रोड शो साठी तयार आहेत. ‘मोदी झिंदाबाद’च्या घोषणा देत तरुण सोबत आहेत. ठिकठिकाणी ते पारंपरिक ग्रामीण पद्धतीने संवाद साधतात. प्रत्येकाला ते राम राम करतात. क्रीडा क्षेत्रात देशाला प्राप्त करून दिलेला बहुमान आणि सलग चार पिढय़ा सैन्यात राहून देशसेवा करत असल्याचा उल्लेख करण्यास ते विसरत नाहीत. शहरी भागात ते पदयात्रा करतात. तर ग्रामीण भागात गावोगावी चौकसभा घेतात.

ऑलिम्पिकमध्ये 2004 साली नेमबाजीत भारताला रौप्यपदक मिळवून देणारे राजवर्धन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी, माजी केंद्रिय मंत्री आणि कॉँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सी. पी. जोशी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक प्रचारसभेत ते मुद्दा मांडतात, जोशी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री होते. तरीही ते जयपूर आणि या संपूर्ण ग्रामीण भागात येणार्‍या दिल्ली-जयपूर महामार्गाचे काम पूर्ण करू शकले नाहीत.

राजवर्धन सिंह यांचा ताफा जसा बानसूरबाहेर येतो, तेथे मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उभे असतात. गुर्जर समाजातील लोक त्यांना नोटांची माळ देण्याचा आग्रह करतात. कर्नल त्यास नकार देतात. मला नोटांची माळ नको, आशिर्वाद हवा, असे सांगतात. पुढचे गाव कुर्‍हाडा. तेथे पिंपळवृक्षाखाली 100 हून अधिक ग्रामस्थ त्यांची वाट पाहात आहेत. तेथील सभेत राजवर्धन जोशींवर टीका करतात. म्हणतात, मी तर येथील स्थानिक मतदार आहे. बाहेरचे तर ते आहेत. ते तर येथे मतदानही करू शकत नाहीत.

दुपारी दोनला ते विराटनगरला पोहोचतात. सभास्थळानजीक उभे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हरी सिंह म्हणतात, यावेळी राज्यवर्धन यांनाच मत देणार. ते देशातील तरुणांचे आदर्श आहेत. त्यांच्या शेजारी उभा असलेला विकास गुर्जर हा तरुण म्हणतो, मी मोदींसाठी राठोड यांना मत देणार आहे.

लष्करातून राजकारणात का आलात?
आमच्या चार पिढय़ांनी लष्करात राहून देशाची सेवा केली. राजकारण हा देखील देशसेवेचाच मार्ग आहे. देशात आता स्थिती चांगली नाही. त्यामुळे चांगल्या लोकांनी या क्षेत्रात येणे आवश्यक आहे.

सीपी जोशी अनुभवी आणि आपण राजकारणात नवे आहात?
ते अनुभवी असते, तर राजस्थानला फायदा झाला असता. जोशी येथून निवडणूक लढवत आहेत. येथून जाणारा जयपूर-दिल्ली महामार्गही ते दुरुस्त करू शकले नाहीत. मी प्रत्येक स्पर्धेत जिंकण्याच्या दृढनिश्चयानेच उतरतो. माझी ऑलिम्पिक कामगिरी पाहा.