आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चनजी गाढवांचा प्रचार करू नका, मोदींवर टीकेसाठी अखिलेश यांचे एका दगडात दोन पक्षी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारसभांतील भाषणबाजीत सुरू असलेल्या शाब्दिक हल्ल्यांत सोमवारी ‘गाढव’ शब्दही समाविष्ट झाला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडताना हा शब्द वापरला.
 
या हल्ल्याचे निमित्त बनले बिग बी अमिताभ बच्चन. टीव्हीवर गाढवाची एक जाहिरात येते.  गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नका, असे या शतकातील महानायकाला माझे सांगणे आहे. गुजरातच्या तर गाढवांचाही प्रचार केला जात आहे आणि पंतप्रधान दोष मात्र मला देत आहेत, असे उंचाहार येथील एका प्रचारसभेत अमिताभ बच्चन यांना सल्ला देताना अखिलेश म्हणाले. 
 
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन गुजरातच्या पर्यटन विभागाचे ब्रँड अम्बेसेडर आहेत. अखिलेश यादवांनी ज्या जाहिरातीचा उल्लेख केला, त्या जाहिरातीत अमिताभ बच्चन कच्छच्या युद्ध मैदानात असलेल्या वाइल्ड एस. अभयारण्याचा प्रचार करताना दिसत आहेत.
 
  बुंदेलखंडमधील उरई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची परिवर्तन संकल्प रॅली सुरु आहे. यावेळी त्यांनी बुंदेलखंडला विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर राज्याला सपा-बसपाच्या चक्रातून सोडवण्याचे आवाहान जनतेला केले. 
 
देशातील पहिल्या 20 राज्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे नाव नाही, याचे खेदाने सांगावे लागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येथे चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक राज्यातील विविध भागांमध्ये प्रचारसभा करत आहेत. अखिलेश यादव यांच्या आज विविध ठिकाणी 6 प्रचारसभा आहेत. 
 
चौथ्या टप्प्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी मतदान 
- उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचे तीन टप्पे झाले असून 12 जिल्ह्यातील 53 मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 
- त्यात प्रतापगढ़, कौशांबी, अलाहाबाद, जालौन, झांसी, ललितपुर, महोबा, हमीरपुर, बांदा, चित्रकूट, फतेहपुर आणि रायबरेली यांचा समावेश आहे.  
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अखिलेश यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे... 
   
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...