आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंदके देत घेतली मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी शपथ, जेठमलानी करणार जयललितांची वकिली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मंत्रीपदाची शपथ घेताना गोकुल इंदिरा यांना अश्रू लपवता आले नाही.

चेन्नई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एआयएडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांच्यावतीने सोमवारी जामीन अर्ज दाखल करण्यात आला. मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जयललितांची वकिली ज्येष्ठ वकील राम जेठमलानी करणार आहेत.
दरम्यान, पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पन्नीरसेल्वम यांच्याबरोबरच इतर 32 मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळ अनेक मंत्री एवढे भावूक झाले होते की, त्यांना अश्रू आवरता आले नाही. त्यामुळे शपथ घेतानाच त्यांना रडू कोसळळे. यात गोकुल इंदिरा, नाथम आर. विश्वनाथन, आर वैथीलिंगम यांचाही समावेश होता.


एकेकाळी शेती करणारे आणि चहा विक्री करणारे पन्नीरसेल्वम जयललिता यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. OPS च्या नावाने ओळखले जाणारे पन्नीरसेल्वम यांना जयललितांचे सर्वात नीकटवर्तीय आणि प्रामाणित म्हणून ओळखले जात होते. पन्नीरसेल्वम यांना 2001 मध्येही हंगामी मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यावेळी जयललिता यांना एका गुन्हेगारी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावली होती व त्या प्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला होता. पन्नीरसेल्वम यांनी रविवारी सायंकाळी राज्यपाल के रोसैय्या यांची भेट घेतली होती.
पुढील स्लाइडवर, पाहा पनीरसेल्वम आणि जयललिता यांचे काही PHOTO