आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या काळात राममंदिर होणार, खासदार साक्षी महाराजांनी केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्नाव(उप्र) - राममंदिरभाजपच्या शासनकाळातच होईल. आम्ही सत्तेचे एक वर्ष पूर्ण केले आहे. आणखी चार वर्षे शिल्लक आहेत. मंदिर आज ना उद्या निश्चित होईल, असे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी रविवारी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील त्यांचा मतदारसंघ उन्नावमध्ये ते म्हणाले, आम्ही राम मंदिर आंदोलनातून पुढे आलो आहोत. आमच्या अजेंड्याचे समर्थन करणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपने आमच्या मंदिर अजेंड्याचे समर्थन केले आहे. राममंदिर ना काँग्रेस, ना मुलायम करणार; मात्र भाजपच्या कार्यकाळात ते निश्चित होईल. मोदी सरकार केवळ विकास करण्यासाठी नव्हे, तर राममंदिरासह भगवा अजेंडा पूर्ण करण्यासाठी आहे, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी केले आहे. यानंतर साक्षी महाराज यांनी वरील विधान केले आहे.

मतांसाठी भाजपचा खटाटोप : काँग्रेस
साक्षीमहाराजांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी पंतप्रधान मोदी यांनी साक्षी महाराजांच्या विधानाला पाठिंबा आहे काय हे स्पष्ट करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया म्हणाले, भाजप निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून हा मुद्दा उपस्थित करत आहे. राजद प्रमुख लालू यादव यांनी साक्षी महाराज संघाची भाषा बोलत असल्याचे म्हटले आहे.