आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिमने एक दीपक सुद्धा लावला नाही, अशी होती तुरुंगात गुरमीतची पहिली दिवाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरमीतने तुरुंग प्रशासनाकडून दिलेली मिठाई स्वीकारली नाही. - Divya Marathi
गुरमीतने तुरुंग प्रशासनाकडून दिलेली मिठाई स्वीकारली नाही.
रोहतक - एकेकाळी दीड लाख दिवे लावूण वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या गुरमीत बाबा राम रहीमने या दिवाळीला एक दिवाही लावलेला नाही. तुरुंगात पहिली दिवाळी साजरी करणारा राम रहीम खूप बेचैन होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी प्रशासनाने गुरमीतला मिठाई दिली होती. मात्र, त्याने मिठाई घेण्यासही नकार दिला. दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी रामरहीम 20 वर्षांचा तुरुंगवास भोगत आहे. तो सध्या सुनारिया जेलमध्ये कैद आहे. 
 
चार दिवसांपूर्वी पत्नीने दिलेली मिठाई खाल्ली...
- तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी निमित्त कैद्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सर्वांनाच मिठाई वाटण्यात आली होती. मात्र, गुरमीतने ती मिठाई घेण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे, तर त्याने दीपक किंवा मेणबत्ती सुद्धा पेटवली नाही. 
- मिठाई घेण्यास नकार देण्यासाठी गुरमीतने नंतर कारण सांगितले. आपल्याला मधुमेह असल्याने मिठाई घेतली नाही असे त्याने तुरुंग प्रशासनाला सांगितले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या कुटुंबाकडून मिळालेली मिठाई आवश्य खाल्ली. 4 दिवसांपूर्वी गुरमीतच्या पत्नी आणि मुलासह कुटुंबियांनी त्याची तुरुंगात भेट घेतली. त्याचवेळी गुरमीतला ही मिठाई दिली होती.
 
 
दिवे लावण्याचा रेकॉर्डही राहिला नाही
>> गुरमीत राम रहीमला दिवाळीनिमित्त दिवे लावण्याची खूप आवड होती. डेरा सच्चा सौदामध्ये साधू राहिलेल्या हंसराजने सांगितल्याप्रमाणे, गुरमीत आपल्या आश्रमात धूमधडाक्यात दिवाळी साजरी करायचा... यात दिवे हातात घेऊन थांबणाऱ्या खास मुली बोलावल्या जात होत्या. या तरुणींच्या हातात थाळी देऊन त्यावर दिवे ठेवले जात होते. आणि रामरहीम त्या रस्त्यावरून स्टाईलने चालत आपल्या गुहेतून बाहेर पडायचा... 
>> याच मोहापायी त्याने 23 सप्टेंबर 2016 रोजी 1.5 लाख दिवे पेटवून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने तो विक्रम मोडीस काढला आहे. यूपी सरकारने सरयू नदीच्या किनाऱ्यांवर 1.7 लाख दिवे प्रज्वलित करून हा रेकॉर्ड मोडला आहे. 
बातम्या आणखी आहेत...