आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाचे \'भक्‍त\'ही करायचे बलात्‍कार; वाचा पिडीतेने सांगितलेली आपबिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बागपत- बलात्‍कार आणि लैगिंक शोषणाच्‍या गुन्‍ह्याखाली डेरा सच्‍चा सौद्याचे प्रमुख गुरमीत राम रहिम तुरुंगात गेल्‍यानंतर त्‍याच्‍या आश्रमातील अनेक राज बाहेर येत आहेत. डे-यावर बाबाच नव्‍हे तर त्‍याचे चेलेदेखील महिलांवर अत्‍याचार करायचे, असे आता समोर येत आहे. बागपतमधील बरनवा येथे शेतक-यांची जमीन अधिग्रहण करुन डे-याची स्‍थापना करण्‍यात आली होती. जमिनीवर कब्‍जा मिळवण्‍यासाठी बाबाच्‍या चेल्‍यांनी जी क्रुरता केली, महिलांवर जे अत्‍याचार केले त्‍याची कहाणी एका पिडीतेने सांगितली आहे. 

दहशत पसरावी म्‍हणुन करायचे रेप 
- बाबाच्‍या चेल्‍यांच्‍या बलात्‍काराची शिकार झालेल्‍या भगवती यांनी 27 वर्षांपूर्वी झालेल्‍या या अत्‍याचाराला वाचा फोडली आहे. 
- त्‍यांनी सांगितले, 'बागपतमधील बरनावा येथे 1980 साली डेरा सच्‍चा सौदाची स्‍थापना करण्‍यात आली होती. 10 वर्षांनंतर गुरमित राम रहित डे-याचा प्रमुख बनला आणि त्‍याने येथील वन विभागाच्‍या जमिनीला हडपण्‍याचा प्रयत्‍न सुरु केला.' 
- 'आमची शेतजमीन शेखपुरा गावात आहे. या जमिनीला बाबाने हडपण्‍याचा प्रयत्‍न सुरु केला होता. जे शेतकरी याला विरोध करायचे त्‍यांचे जगणे कठीण केले जायचे. जंगलात चारा आणण्‍यासाठी डे-याजवळून जाणा-या महिलांना बाबाचे चेले मारहाण करायचे. त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करायचे. याची कुठे वाच्‍यता केली तर जिवे मारण्‍यात येईल, अशी धमकी त्‍यांना दिली जायची.' 
- 'या घटनांना 27 वर्षे होऊन गेली आहेत. मात्र आमच्‍या जखमा अजुनही ताज्‍या आहेत. राम रहिम जेलमध्‍ये गेल्‍यानंतर आमच्‍या न्‍यायाच्‍या आशा जिवंत झाल्‍या आहेत. आम्‍ही जिल्‍हाधिका-यांना याप्रकरणी कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.' 
काय म्‍हणणे आहे पोलिसांचे? 
- बागपतचे एसपी डी. प्रदीप कुमार यांनी म्‍हटले आहे की, 'आमच्‍याकडे अशी कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. आल्‍यास चौकशी करुन कारवाई केली जाईल.' 

पुढील स्‍लाइडवर वाचा, जमीन हडपण्‍यासाठी महिलांना कसे केले टॉर्चर...  
बातम्या आणखी आहेत...