आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांना स्वत:चे रक्त असे पाजायचा राम रहीम, या जडीबुटीने करायचा ब्रेनवॉश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीम भक्तांना आपले रक्त पाजायचा. - Divya Marathi
राम रहीम भक्तांना आपले रक्त पाजायचा.
सिरसा (हरियाणा) - रेपिस्ट राम रहीमबद्दल दररोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्याचा उलगडा डेऱ्याच्या एका माजी भक्तानेच केला आहे. भक्त म्हणाला की, राम रहीम एका जडीबुटीने संमोहन करून साधूंचे ब्रेनवॉश करून त्यांच्यावर पूर्ण ताबा मिळवायचा. एवढेच नाही, राम रहीम आपल्या बोटाने रक्त काढून सरबतात मिसळून आपल्या समर्थकांना पाजायचा. यानंतर भक्तांचे ध्यान भरकटून जायचे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- बाबाचा माजी भक्त हंसराज म्हणाला की, राम रहीमने या जडीबुटीच्या औषधाला तयार करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यांना नेमले होते. ही बुटी खाऊ घालून साधूंना नपुंसक बनण्यासाठी ब्रेनवॉश केले जायचे.
- ते पुढे म्हणाले की, नपुंसक बनवण्यासाठी स्पेशल डॉक्टर्सची टीम बाबाने तयार केलेली होती. जी ऑपरेशन करून साधूंना नपुंसक बनवायची. यात 13 वर्षांच्या मुलापासून ते प्रौढ माणसांचाही समावेश होता.
- राम रहीम म्हणायचा की, तुम्ही साधू झाले आहात, तुम्हाला परमात्म्याचे सरळ दर्शन होईल. काहीच अडचण येणार नाही.
 
जाणूनबुजून करायचा गुरू गोविंदसिंगांची वेशभूषा...
- एका मीडियाला दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, 2007 मध्ये जेव्हा मी डेऱ्यात होतो तेव्हा राम रहीमने जाणूनबुजून गुरू गोविंदसिंगांची वेशभूषा परिधान केली. जेणेकरून लोकांना वाटावे की तो एखाद्या अवतारापेक्षा कमी नाही.
- यादरम्यान बाबाने एक पेय - 'जाम ए इन्सां' बनवले. यात बाबाने काही पदार्थ (पतासे), रुहआफजा मिसळून घेऊन आला. मग बाबाने आपल्या बोटाला चिर देऊन ते रक्त त्यात मिसळले आणि सर्व भक्तांना तेच पाजण्यात आले.
 
20 वर्षे तुरुंगातच सडणार राम रहीम
- दोन साध्वींवर बलात्कारप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- कोर्टाने राम रहीमला एकूण 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यातील 15-15 लाख रुपये दोन रेप केसचे असून त्यापैकी 14-14 लाख रुपये दोन्ही बलात्कार पीडित साध्वींना नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील.
- शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीम कोर्ट रूममध्ये स्फुंदून-स्फुंदून रडायला लागला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...