आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमच्या लक्झरी गाडीत सापडले सॅनिटरी नॅपकिन, बघा अशा दिसते अलिशान कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- 2002 मधील साध्वी बलात्कारप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला याला सीबीआयच्या विशेष कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच त्याला 65 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी रामरहीमच्या काही लक्झरी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. एका गाडीत सॅनिटरी नॅपकिन सापडले आहेत. तसेच मोठा शस्त्रसाठाही सापडला आहे.

दरम्यान, 25 ऑगस्टला पंचकूलामध्ये झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या 38 वर पोहोचली आहे. पोलिसांनी बाबा रामरहीम यांच्या ताफ्यातील काही लक्झरी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यात पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या आहेत. सॅनिटरी नॅपकिनचा समावेश आहे. सध्या ही गाडी पंचकूला येथील मनसा देवी पोलिस ठाण्याच्या परिसरात उभी आहे. बाबांच्या गाडी आलिशान पद्धतीने आतून सजवण्यात आल्या आहेत.

कारमध्ये सापडले शस्त्र...
- पोलिसांनी माहिती दिली की, हिंसाचारानंतर रामरहीम पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्या ताफ्यातील काही काड्यांमध्ये कपड्यांनी भरलेल्या सुटकेस आणि शस्त्रही सापडले आहेत.
- फायर ब्रिगेडच्या गाडीत एक 5/4 चा बॉक्स मिळाला आहे. साधारणत: असा बॉक्स फायर टेंडरमध्ये नसतोच.
- बॉक्सची तपासणी केली असता यात पेट्रोल भरलेले होते. पाणी येणार्‍या नळातून पेट्रोल सोडून नंतर आग लावण्यात येणार होती. आगडोंब उसळल्यानंतर समर्थकांच्या मदतीने बाबा पळून जाण्याच्या तयारीत होता.
- गाड्यांमध्ये शस्त्रही सापडले आहेत.
- लक्झरी गाड्यांमध्ये काही सुटकेसही सापडल्या आहेत. त्यात बाबाचे अनेक ड्रेस आहेत.
- लक्झरी गाड्यांमध्ये महागडे पडदे लावण्यात आले आहेत. ‍सीट कव्हर देखील आरामदायक आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... रामरहीमच्या लक्झरी गाडीमध्ये आणखी काय सापडले?
बातम्या आणखी आहेत...