आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमला \'बब्बर शेर\' म्हणायचे लोक, शिक्षा झाल्यावर गावाचे झाले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमच्या गावात लागलेले पोस्टर. - Divya Marathi
राम रहीमच्या गावात लागलेले पोस्टर.
श्रीगंगानगर - येथे 15 दिवसांपूर्वीच राम रहीमच्या जन्मदिनाच्या निमित्ताने लावलेले पोस्टर आजही उभे आहे. या पोस्टरमध्ये राम रहीमला बब्बर शेर म्हटले आहे. सोबतच त्याच्या वाढदिवसामुळे येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु आता बाबाचे जन्मगाव गुरसर मोडियामध्ये शुकशुकाट पसरला आहे.
 
असे आहेत गावाचे हाल...
- डेराप्रमुख गुरमित राम रहीम जेलमध्ये गेल्याचा परिणाम गुरसर मोडियामध्ये दिसतोय. येथे डेऱ्याशी निगडित शिक्षण संस्था आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे.
- फक्त शाळा-कॉलेजबाबत बोलायचे तर 30 टक्के विद्यार्थीही शाळेत येत नाहीयेत. हॉस्पिटलमध्येही रुग्णांची संख्या निम्मी झाली आहे.
- डेऱ्याशी निगडित लोकांचा तर्क होता की इंटरनेट बंद असल्याने शाळा सुरू केल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना देता आला नाही, परंतु मंगळवारी रात्री उशिरा इंटरनेट सेवा सुरू होऊनही मुले शाळेत गेली नाहीत.
- राम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर डेऱ्याशी निगडित प्रत्येक संस्थेवर परिणाम दिसू लागला आहे. भक्तांमध्येही वेगळेच भयाचे, उदासवाणे वातावरण पसरले आहे. त्यांच्या श्रद्धेवर मोठा आघात झाला आहे.

रुग्णालयाची ओपीडी 125 वरून 50 वर आली
- बाबाने गुरसर मोडियामध्ये बांधलेल्या जनरल हॉस्पिटलमधील ओपीडी तर घटली आहेच, शिवाय वॉर्डही रिकामे पडले आहेत.
- येथे दररोज किमान 125 वा त्याहून जास्त ओपीडी व्हायची. पण आता हा आकडा खूप कमी झाला आहे.
- येथे आता 50 ते 55 पर्यंत रुग्ण आहेत. भास्कर टीम रुग्णालयात गेली असता अनेक वॉर्ड ओस पडलेले दिसले.
 
3 शाळा, सर्वांमध्ये विद्यार्थी घटले
- गावात बाबाच्या 3 शिक्षण संस्था आहेत. यात मुले आणि  मुलींच्या सीनियर सेकंडरीच्या दोन शाळा आहेत. आणि एक मुलींसाठीचे कॉलेज सामील आहे.
- तिन्हींमध्ये जवळपास 2300 हून अधिक मुले शिकतात. मुलींच्या शाळेत 1200 च्या जवळपास विद्यार्थिनी आहेत.
- मुलांच्या शाळेत 750 आणि मुलींच्या कॉलेजमध्ये 300 जवळ विद्यार्थिनी शिकतात. सध्या डेरा भक्त आपल्या मुलांना शाळेत पाठवायला घाबरत आहेत. सध्या फक्त 70 टक्केच मुले शाळेत आलेले दिसले.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बलात्कारी राम रहीमच्या गावाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...