चंदीगड- रामरहिम याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर पंचकूलात दंगल घडवून आणल्यानंतर आणखी एक मोठा कट रचला होता. त्यांचा हा कट मात्र सफल होऊ शकला नाही. पंचकूला पोलिसांनी डेरातून जी वाहने जप्त केली आहेत. त्यात फायर ब्रिगेडच्या एका गाडीचा समावेश आहे. त्यात खूप मोठा केमिकलचा साठा आहे. याचा वापर पेट्रोल बॉम्ब बनविण्यासाठी केला जाऊ शकतो.
- डेरा प्रमुख रामरहिम याला 25 ऑगस्ट रोजी दोषी ठरविण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
- पोलिसांनी डेरातील वाहने जप्त केली असून यात एका फायर ब्रिगेडच्या वाहनाचा समावेश आहे. यात पाण्याऐवजी मोठया प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ आहेत.
- या टॅंकरची क्षमता 1200 लीटरची आहे. ज्वलनशील पदार्थांनी भरलेली हा गाडी पंचकूलात दाखल होण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागली. त्यामुले एक मोठी घटना टाळण्यात पोलिसांना यश आले.
- पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये अनेक लक्झरी वाहनांचा समावेश आहे.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती