आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्याच्या राजवटीत राममंदिर अशक्यच, गृहमंत्री राजनाथ यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - आमच्या सरकारच्या या कार्यकाळात तरी अयोध्येत वादग्रस्त परिसरात राममंदिराची उभारणी शक्य नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या आमच्या कार्यकाळात राज्यसभेत बहुमत येण्याची आशा अत्यंत अंधुक आहे. परिणामी राममंदिरासाठी कायदा करता येणार नाही. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. लोकसभेत भाजपला बहुमत असले तरी २४३ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपचे केवळ ४५, तर विरोधी पक्षांचे किमान १३२ खासदार आहेत. पुढील चार वर्षांतही भाजपला राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता नाही.
बातम्या आणखी आहेत...