आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन भागवत म्हणाले - माझ्या हयातीत बनेल अयोध्येत राम मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिरावर वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात भागवत म्हणाले, 'अयोध्येत माझ्या हयातीत राम मंदिर तयार होईल. ते केव्हा आणि कसे बनेल हे कोणी सांगू शकत नाही, मात्र आशा आहे की ते आपल्या डोळ्यांदेखत तयार होईल.' त्यांनी यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची गरज व्यक्त केली.

काय म्हणाले सरसंघचालक
- भागवत म्हणाले, 'अयोध्येत राममंदिरासाठी सावधगिरी बाळगून नियोजन करावे लागेल. आशा आहे की माझ्या हयातीतच ते तयार होईल. आपल्या डोळ्यांनी आपण ते पाहू. मात्र हे सांगू शकत नाही की ते केव्हा आणि कसे तयार होईल ? मात्र त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागले आणि तयारही राहावे लागेल.'
- 'मंदिर निर्माणासाठी आम्हाला जोश आणि होश दोन्ही योग्यपद्धतीने हताळावे लागतील. राम आणि शरद कोठारी यांनी याची सुरुवात केली होती.अयोध्येत रामाचा जन्म झाला होता त्यामुळे तिथे हे मंदिर होणे गरजचे आहे.'
- अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा उल्लेख करुन भागवत म्हणाले, 'अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला यासाठी झाला की ते अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतिक होते. आणि त्याच पद्धतीने अयोध्येत राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला कारण ते आमच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. तेव्हा आपण कमकुवत होतो त्यामुळे अधिक प्रतिकार करु शकलो नाही. मात्र आता काम पूर्ण करण्याची वेळ आली आहे.'
- 'भारतीय संस्कृती सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. आम्ही विविधतेत एकता पाहातो, हीच आमची संस्कृती आहे.'
- 'धर्म कधीही दहशतवादाची शिकवण देत नाही, तो आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण देतो.'