आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविंद बिहारचे नवे राज्यपाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद यांना बिहार, तर शिक्षणतज्ज्ञ आचार्य देवव्रत यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त केले. कोविंद यांची नियुक्ती करण्यापूर्वी केंद्र सरकारने सल्लामसलत केली नसल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. कोविंद (६९) हे मूळचे कानपूरचे आहेत. १९९४ ते २००६ दरम्यान ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. अनुसूचित जाती मोर्चाचे ते अध्यक्ष राहिले. आचार्य देवव्रत १९८१ पासून हरियाणात कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाचे आचार्य आहेत. त्यांचा नि:स्वार्थ सेवेसाठी अमेरिकेतील बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटच्या वतीने गौरव झाला होता; परंतु बिहारमध्ये दाेन-तीन महिन्यांत निवडणूक होणार आहे.