आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdev Baba Airport Women Show Salwar Raipur News Chattisgarh

रामदेव पुढे महिला मागे! एअरपोर्टवर बाबांना सलवार-कमीज भेट देण्याचा होता इरादा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगड /रायपूर - रामदेव बाबा मंगळवारी सायंकाळी महिलांना घाबरून पळत होते. झाले असे की, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रामदेव बाबांना सलवार-कमीज भेट देण्यासाठी आल्या होत्या. त्यांची नजर चुकवत रामदेव बाबांनी एका छोट्या गाडीने एअरपोर्ट गाठले, मात्र गाडीतून उतरताना महिलांनी त्यांना पाहिले. त्या त्यांच्या दिशेने धावल्या तर रामदेव बाबांनीही धावतच एअरपोर्टमध्ये प्रवेश केला. रामदेव बाबांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रामदेव बाबांना सळोकीपळो करून सोडले.

रामदेव बाबा एअरपोर्टवर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्षा आशा जोसेफ, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ममता रॉय यांच्यासह काही महिला सलवार-कमीज घेऊन एअरपोर्टवर त्यांची वाट पाहात उभ्या होत्या. ही बातमी रामदेव बाबांच्या समर्थकांना कळाली. त्यांनी रामदेव बाबांना मोठ्या गाडी एवजी छोट्या गाडीने एअरपोर्टवर आणले. मात्र, रामदेव बाबांना गाडीतून उतरतानाच महिला कार्यकर्त्यांनी पाहिले आणि त्या सलवार-कमीज घेऊन त्यांच्या मागे धावू लागल्या. बाबा पुढे आणि महिला मागे असे दृष्य एअरपोर्टवर पाहायला मिळाले. सुरक्षा रक्षकांना हा काय प्रकार आहे हे कळेपर्यंत महिला गेटवर येऊन धडकल्या होत्या. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तिथेच अडवले तेव्हा त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले होते रामदेव बाबा...