आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdevs Brother Held For Death In Ashram Violence

पतंजली फूड पार्कमध्ये एकाची हत्या, योगगुरु रामदेव बाबांच्या बंधुला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: रामदेव यांचे बंधु रामभरत यांना अटक करताना पोलिस)
हरिद्वार- पतंजली हर्बल फूड पार्कचे सुरक्षारक्षक आणि ट्रकचालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या हिंसक घटनेत एकाचा मृत्यू झाला. तसेच 12 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी योगगुरु रामदेव बाबांचे बंधु रामभरत याला अटक केले आहे. रामभरतवर हत्येचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

आरोपी रामभरत याने फूड पार्कमधील कर्मचार्‍यांना चिथवल्यामुळेच ही हिंसक घटना घडल्याचे हरिद्वारच्या एसएसपी स्वीटी अग्रवाल यांनी म्हटले आहे. बुधवारी (27 मे) झालेल्या या हिंसेत 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय पार्क परिसरातील अनेक दुकाने आणि वाहने जाळण्यात आली आहेत.

मिळालेली माहिती अशी की, पंतजली हर्बल फूड पार्कचे सुरक्षारक्षक आणि ट्रकचालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये माल भरण्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र, बुधवारी (27 मे) या वादाला हिंसक वळण लागले. नाराज ट्रक चालकांनी पार्कच्या बाहेर चक्काजाम आंदोलन केले. ट्रक पार्कमध्ये नेणार नाही. माल भरणार नाही, अशा घोषणाही दिल्या. पार्कचे सुरक्षारक्षक आणि ट्रक चालकांमध्ये सुरवातीला चांगलीच बाचाबाची झाली. नंतर मात्र ते हमरीतुमरीवर उतरले. सुरक्षारक्षकांनी ट्रकचालकांना मारहाण गेली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर गोळीबारही केला. त्यात ट्रकचालक संघटनेच्या 42 वर्षीय पदाधिकार्‍याचा मृत्यू झाला. दलजीत सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

काय म्हणाले बाळकृष्ण..
सुरक्षारक्षकांवर ट्रकचालकांनी दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी प्रत्युत्तरात कारवाई केल्याचे पतंजली योगपीठाचे प्रवक्ता आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी पार्कमधून जप्त केल्या रायफल्स
स्थानिक मीडियाच्या अहवालानुसार, पोलिसांनी पंतजली फूड पार्कमधून सहा रायफल्स जप्त केल्या आहे. फूड पार्कमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ट्रक चालक संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून रामभरत, पार्कच्या परिवहन विभागाचा कर्मचारी अनिल गोस्वामी व योगेश कुमार, खासगी सुरक्षारक्षकांसह 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, फूड पार्कमध्ये काही महिन्यांपूर्वी एका व्यवस्थापकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. परंतु अद्याप हे प्रकरण गुलदस्त्यातच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज ....