आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramjas Row Babita Phogat Yogeshwer Dutt A Dig At Javed Akhters Hardly Literate Barb

देशभक्ती पुस्तकातून येत नाही, जावेद अख्तर यांना रेसलर बबिता फोगाटचे प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एबीव्हीपीविरोधात मंगळवारी मोर्चा निघाला. - Divya Marathi
एबीव्हीपीविरोधात मंगळवारी मोर्चा निघाला.
नवी दिल्ली - गुरमेहर कौरने आपण वादापासून दूर राहात असल्याचे ट्विट करुन एकप्रकारे यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र शो बिझनेस आणि क्रीडा जगतातील सेलेब्रिटिज अजूनही सोशल मीडियातून चर्चेत राहाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गुरमेहरवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी बबीता फोगाट आणि योगश्वर दत्त यांचा समाचार घेतला. त्यांनी बबीता आणि योगेश्वर यांना अल्पशिक्षित म्हटले. त्यावर रेसलर बबीताने देशभक्ती पुस्तकात येत नसल्याचे ट्विट केले आहे. 

दुसरीकडे, चित्रपट निर्माता मधुर भंडारकर बबीताच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. जावेद अख्तर यांनी वीरेंद्र सहवाग आणि बबीताने गुरमेहर कौरवर केलेल्या पोस्टवर ट्विट करुन म्हटले होते, अल्पशिक्षित खेळाडू किंवा रेसलर शहीदाच्या कन्येवर बोलत असतील तर समजू शकतो, मात्र उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना काय म्हणावे ? 
बबिता फोगाटने मंगळवारी सायंकाळी ट्विट केले होते. ती म्हणाली, 'जावेद अख्तर, मी शाळेही पाहिली नव्हती तेव्हापासून भारत माता की जय म्हणत आले आहे. देशभक्ती पुस्तकातून शिकून येत नाही.'
- अशाच प्रकारे योगेश्वर दत्तनेही ट्विट करुन अख्तर यांना प्रत्युत्तर दिले. 'जावेद अख्तरजी, आपण कथा-कविता लिहिल्या तर आम्हीही काही कारनामे केले, भलेही ते छोटे असतील. भारताचे नाव जगाच्या पटलावर पोहोचवले.'
- दिग्दर्शक मधुर भंडारकरने बबिता आणि योगेश्वरचे समर्थन केले आहे. त्याने ट्विट केल, 'सर, अल्पशिक्षित असण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. मी सहावी नापास आहे, म्हणून मला माझे विचार व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही.'
जावेद अख्तर का म्हणाले अल्पशिक्षित
- गुरमेहरच्या एबीव्हीपी विरोधानंतर क्रिकेट, बॉलिवूड आणि केंद्रीय मंत्र्यांनीही तिला लक्ष्य केले होते. 
- वीरेंद्र सहवागने गुरमेहरची खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती. 
- सोशल मीडियावरील या 'शाब्दिक' चकमकीत बबिता फोगाट आणि रणदीप हुड्डा यांनीही उडी घेतली होती. 
- यावरुन जावेद अख्तर यांनी हिंसाचार बंद करण्यासाठी मोहिम सुरु केलेल्या गुरमेहरची बाजू घेऊन ट्विट केले होते. वास्तविक त्यांनी सहवाग, बबिता आणि योगेश्वरचे नाव त्यात घेतले नव्हते. 
 
कसा सुरू झाला वाद 
- दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद आणि शहला राशिद यांना निमंत्रित करण्यात आले होते. 
- खालिद इतिहासाचा विद्यार्थी असून तो या विषयासंदर्भात पेपर सादर करणार होता. याला एबीव्हीपीने कडाडून विरोध केला होता. कारण खालिदवर जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप होता. 
- त्यानंतर मागील बुधवारी एआयएसए आणि एबीव्हीपी यांच्यात हाणामारी झाली होती. 
- एबीव्हीपीच्या दबावापुढे झुकत रामजस कॉलेजने परिषद रद्द केली होती. 
 
कोण आहे गुरमेहर 
- गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद कॅप्टन मनदीपसिंह यांची मुलगी आहे. गुरमेहर दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. इंग्लिश लिटरेचरचा ती अभ्यास करत आहे. मुळची लुधियानाची आहे.
- वडील कॅप्टन मनदीपसिंह काश्मीरमधील कारगिलमध्ये 1999 शहीद झाले होते. तेव्हा गुरमेहर अवघी 2 वर्षांची होती. 
 
काय आहे वादग्रस्त व्हिडिओचे सत्य आणि कसा वाढला वाद 
- गुरमेहरचा 36 कार्ड पकडलेला एक व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले. वास्तविक गुरमेहरने हा व्हिडिओ गेल्यावर्षी 28 एप्रिल रोजी शेअर केला होता.
- गुरमेहरने 22 फेब्रुवारी रोजी तिचे फेसबुक प्रोफाइल पिक्चर बदलून 'सेव्ह डीयू कॅम्पेन' सुरु केले. 
- या फोटोमध्ये गुरमेहर एक कार्ड हातात घेऊन होती. त्यावर #StudentsAgainstABVP हॅशटॅगने लिहिले होते, 'मी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेते. ABVP ला घाबरत नाही. मी एकटी नाही. भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे.'
- गुरमेहरचा हा फोटो वेगाने शेअर झाला. अनेकांनी अशाच प्रकारचे कार्ड हातात घेतलेले प्रोफाइल पिक्चर अपलोड केले आणि एबीव्हीपीविरोधातील आंदोलनाला धार चढली. 
- यानंतर, काही वेळातच पाकिस्तानबाबतचे तिची एक पोस्ट व्हायरल झाली आणि ट्रोल होऊ लागली. 
- वास्तविक गेल्या वर्षी 28 एप्रिल रोजी गुरमेहरने चार मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये एकानंतर एक असे 36 कार्ड हातात घेते. त्यातील 13 क्रमांकाचे कार्ड व्हायरल झाले. त्यावर लिहिले होते, 'माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारले आहे.'
- गुरमेहरने एबीव्हीपी विरोधात अभियान सुरु केले तेव्हा ट्रोलर्सने तिचा 13 क्रमांकाचे कार्ड हातात घेतलेला फोटो व्हायरल केला. 
- त्यानंतर गुरमेहरला जीवे मारण्यापासून बलात्काराची धमकी देण्यात आली. 
- याविरोधात तिने दिल्ली महिला आयोगात तक्रारही दिली आहे. 
- मंगळवारी सकाळी ट्विट करुन गुरमेहरने मला आता एकटे सोडा असे ट्विट केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे म्हटले. मात्र तुम्ही सर्व यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहनही तिने केले.
- माझ्या वयात जेवढे सहन करता येईल ते सर्व सहन केल्याचे सांगत या मोहिमेतून माघार घेत असल्याचे म्हटले. 
- मला जे म्हणायचे होते, ते मी म्हटले आहे. एक गोष्ट नक्की पुढच्यावेळी हिंसाचार व धमक्यांचे समर्थन करण्यापूर्वी दहा वेळा विचार करु. ही मोहिम त्याचसाठी होती. कुणाला जर माझ्या धाडस आणि शौर्याबद्दल शंका असेल तर मी एवढेच म्हणेन की मी खूप हिम्मत दाखवली आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जावेद अख्तर, बबिता फोगाट यांचे ट्विट.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...