नानकपुरी कॉलनीतील एका बंगल्यात तरूणाबरोबर गेलेल्या तरूणींना कॉलनीतील लोकांनी पाहिल्यांनतर राडा केला. तुम्हाला चाळे करण्यासाठी हीच जागा मिळते का? असा सवाल करत कॉलनीतील महिलांनी युवकांसोबत आलेल्या तरूणींना भर चौकात आणूण चांगलाच चोप दिला. सोबत आलेले तरूण मात्र फरार झाले. बंगल्याच्या शेजारी राहणा-या प्यारी देवी, संतोष वर्मा आणि दीपकने सांगितले की, मागच्या काही दिवसा पासून या बंगल्यात वैश्या व्यावसाय चालू आहे.
कॉलनीतील संतापलेल्या लोकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बंगल्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. बंगल्यात चालत असलेला वैश्या व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा. घरमालकावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिंक लोकांनी केली आहे.
विरोध करणा-यावर चाकूचा वार-
प्यारी देवी, संतोष वर्मा यांनी सांगितले की, मागच्या काही दिवसापासून या बंगल्यात वैश्य व्यवसाय केला जात आहे. प्रत्येक दिवशी बाहेरून मुली या ठिकाणी आणल्या जात असल्याचा आरोप यांनी केला. याठिकाणी धंदा करण्यासाठी येणा-या महिलेला विरोध केला तर तिने चाकूने वार केलाचा आरोप संतोष वर्मा यांनी केला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा छायाचित्रे...