आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rampal\'s BP Get High After Looking Situation Of Satlok Ashram

सतलोक आश्रमाची अवस्था पाहून रामपालचा बीपी वाढला, तिजोरी उघडण्यात अपयश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : रामपालला घेऊन आश्रमात आलेले पोलिस.

हिसार/बरवाला - खून आणि देशद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या रामपाल बाबाला पोलिस रविवारी प्रथमच त्याच्या आश्रमात घेऊन गेले होते. त्यावेळी आश्रमाची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. तेथील भिंती पाडण्यात आलेल्या होत्या. तर चमक पूर्णपणे गेलेली होती. सगळीकडे शातता होती. रामपालच्या भक्तांऐवजी पोलिस होते. ही अवस्था पाहून रामपालचा बीपी वाढला होता. पण काही वेळाने पुन्हा ठीक ढाला.

तपासाच्या तिस-या दिवशी रविवारी पोलिसांनी रामपालला त्यांच्या कोठीतील तिजो-या खोलण्यास सांगितले. त्याने पासवर्डच्या मदतीने तीन तिजो-या उघडल्या पण आश्रमातील सर्वात मोठी तिजोरी मात्र त्याला उघडता आली नाही. वेगवेगळे पासवर्ड टाकून त्याने प्रयत्न केला पण तिजोरी उघडली नाही. अखेर यात काही नाही हवी तर तिजोरी कापून टाका असे उत्तर पोलिसांना दिले.

आश्रमात आणल्यानंतर सुमारे तासभर रामपालची चौकशी करण्यात आली. पोलिस त्याला घेऊन सर्वात आधॉ कॉम्प्युटर रूममध्ये गेले. त्यानंतर प्रवचन हॉलमध्ये त्याच्या सिंहासनाखाली असलेल्या बेसमेंटमध्ये त्याला नेण्यात आले. याठिकाणी सर्वात मोठी तिजोरी होती. तिजो-यांमध्ये काहीही सापडले नसल्याने रामपाल पोलिसांना म्हणाला पाहून घ्या सर्व रिकाम्याच आहेत.
खजाना नसल्याचा दावा
पोलिसांनी रामपालला आश्रमात गुप्त खोली आणि खजाना कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर रामपालने आश्रमात कोणतीही अशी गुप्त खोली किंवा खजाना नसल्याचे स्पष्ट क्ले. तिजो-यांमध्ये केवळ अनुयायांनी दिलेली रक्कम ठेवली जात होती, असे त्याने सांगितले.

आश्रमात पोहोचला, पण प्रवचन नाही
रामपालच्या आश्रमाबाहेर 23 तारखेला प्रवचन होणार असा बोर्ड होता. अटकेनंतर पोलिस रामपालला 23 तारखेलाच चौकशीसाठी आश्रमात घेऊन गेले. पण यावेळी त्याला प्रवचन दे,ा आले नाही. विशेष म्हणजे याठिकाणी एकही भक्त नव्हता.

तिस-या दिवशी सापडलेली शस्त्रे
4 रायफल 315 बोर
5 रायफल 12 बोर
8 जिवंत कारतुसे
2 बुलेटप्रूफ जॅकेट
4250 काठ्या
171 हेल्मेट
235 काळे ड्रेस
12 पेट्रोल बम
35 तेलाच्या पिचका-या
2 गुलेर आणि गोट्या
पुढे वाचा आता मध्यप्रदेशात जाणार पोलिस आणि पाहा तपासाचे फोटो...