आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिमच्या डेरामध्ये सापडला भूयारी मार्ग, बाबाच्या गुहेतून थेट साध्वींच्या निवासस्थानात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा - साध्वी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या येथील मुख्यालयाची शुक्रवारपासून तपासणी सुरु आहे. आज (शनिवार) सर्च ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे.   आतापर्यंत डेरा परिसरात एक गुप्त गुहा आणि बॉम्ब फॅक्ट्री सापडली आहे. दारु-गोळा, फटाके आणि एके-47 चा रिकामा बॉक्स सापडला आहे. 
निवृत्त सत्र न्यायाधीश अनील कुमार पवार यांच्या देखरेखीत सुरु असलेल्या शोध मोहिमेत मानवी सापळे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी डेरामधील बागिचे आणि वंडर पार्कमध्ये खोदकाम केले जाण्याची शक्यता आहे. सर्च टीम डेरामध्ये भूयारी मार्ग आहे का, याचाही शोध घेत आहे. शोधमोहिमच्या पहिल्या दिवशी टीम बाबाच्या गुहेपर्यंत पोहोचली होती. तिथए 1500 जोडी चप्पल-बूट आणि 3000 महागडे डिझायनर कपडे सापडले होते. राम रहिमची कथित कन्या हनीप्रीतच्या रुमचाही शोध शुक्रवारी लागला होता. तिथेही शेकडो चैनीच्या महागड्या वस्तू सापडल्या. याशिवाय डेरामध्ये पाच मुलेही आढळली होती. 
 
दुसऱ्या दिवशी काय-काय सापडले?

1) बाबाच्या महालातून निघेतो गुप्त मार्ग
- गुरमीत राम रहिमच्या गुहेत (बंगला) एक गुप्त मार्ग सापडला आहे. 12 एकर परिसरात राम रहिमचा बंगला आहे. तपास पथकाला या गुहेत एक गुप्त मार्ग सापडला असून तो साध्वींच्या निवासस्थानपर्यंत जातो. राम रहिम आपल्या बंगल्याला गुहा म्हणत होता.
- हरियाणाचे माहिती उपसंचालक सुभाष मेहरा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेला ते म्हणाले, 'डेरामध्ये बंगल्यातून साध्वींच्या निवासस्थानापर्यंत एक भूयारी मार्ग सापडला आहे. याशिवाय डेरामध्ये एक स्फोटकांची कंपनी सापडली आहे.'
 
2) स्फोटके तयार करण्याचा कारखाना 
- सर्च टीमला डेरामध्ये एक स्फोटके तयार करण्याचा कारखाना सापडला आहे. विशेष म्हणजे पशु खाद्य तयार करण्याची फॅक्ट्री असल्याचे सांगून येथे स्फोटके तयार केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या कारखान्याची माहिती सिरसा पोलिसांना नव्हती. 
- कारखान्याच्या मालकाविरोधात एक्सप्लोसिव्ह अॅक्ट अंतर्गत कलम 5 आणि 9बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथून 80 बॉक्स जप्त करण्यात आले आहे. यात फटाके आणि स्फोटके आहे. 
 
3) एके-47 चे रिकामे बॉक्स 
- धर्मिक कार्य आणि अध्यात्माचे काम चालणाऱ्या डेरामध्ये एक-47 चे रिकामे बॉक्स सापडले आहे. अशी शक्यता आहे की यातील साहित्य आधीच डेरातून बाहेर नेण्यात आले आहे. याशिवाय एक वॉकी-टॉकी  जप्त करण्यात आले आहे. 
- डेरामध्ये चार आरा मशिनही सापडल्या असून त्यापैकी दोन विना परवाना असल्याचे समोर येत आहे. आरा मशिने मोठ मोठी लाकडे कापली जातात. 
- जिल्हा वन अधिकारी रामचंद्र जांगडा यांनी सांगितले की विना परवाना दोन्ही मशिन्स जप्त करण्यात आल्या आहे. शक्यता आहे की डेरामध्ये अवैध लाकडूतोडही सुरु होती. 
 
4) डेराचा चार गावांशी संपर्क तुटला, लोक टीव्हीसमोर बसून 
- सिरसामधील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सर्च ऑपरेशन सुरु असल्यामुळे सिरसमाध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे नेजिया, रंगडी आणि बाजेकां या गावांचा सिरसाशी संपर्क तुटला आहे. 
- बाजारांमध्ये वर्दळ कमी आहे. लोक आपापल्या घरात टीव्ही समोर बसून क्षणाक्षणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
पहिल्या दिवशी काय-काय सापडले... 
- टीव्ही प्रसारणासाठी लागणारी ओबी व्हॅन आणि वॉकी-टॉकी 
- विना क्रमांकाची लेक्सस कार, कोणतीही ब्रँड, लेबल नसलेली औषधी 
- दोन खोल्या भरून नोटा, संगणक, हार्ड डिस्क आणि मोबाइल 
- मुख्यालयाजवळील बाजारात १० रुपयांपासून वेगवेगळ्या मूल्यांची प्लास्टिकची नाणी
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आलिशान आहे डेरा प्रवेशद्वार, पोलिस घोड्यावर 
 
बातम्या आणखी आहेत...