आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाने स्वतः रचले होते दंगलीचे षडयंत्र, हनीप्रीतकडे अंमलबजावणी-देखरेखीचे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमला बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. हनीप्रीत फरार आहे. - Divya Marathi
राम रहीमला बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. हनीप्रीत फरार आहे.
चंदीगड - गुरमीत राम रहिमने त्याच्या गुंडांसोबत बैठक करुन पंचकुलामध्ये दंगल भडकवण्याचे षडयंत्र रचले होते. सिरसामधील डेऱ्याच्या मुख्यालयात तीन सत्रांमध्ये ही बैठक झाली होती. पहिल्या बैठकीत गुरमीतने फक्त खास 11 लोकांना बोलावले होते. या बैठकीला तो स्वतः हजर होता. त्याच्यासोबत हनीप्रीतही होती. तिच्यावर जबाबदारी होती की षडयंत्र अंमलात कसे आणायचे त्याचे प्लॅनिंग करायचे. या 11 जणांनी दुसऱ्या बैठकीत इतर 11 डेरा समर्थकांना बाबांचा आदेश काय आहे ते सांगितले. तिसऱ्या बैठकीत डेरा समर्थकांना दंगल कशी घडवायची हे सांगण्यात आले. पाच डेरा समर्थकांना पकडण्यात आल्यानंतर हा खळबळजनक खुलासा झाला आहे. 
 
दंगल भडकवण्यात सहभागी होते पाच जण 
- दंगल भडकवण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेले पाच जण हे डेराच्या 45 सदस्यांच्या समितीचे सदस्य होते, ज्यांना पंचकुलामध्ये दंगल भडकवायची होती. 
- साध्वी लैंगिक शोषणाच्या आरोपाची फायनल हेअरिंग झाल्याबरोबर या लोकांनी पंचकुलामध्ये 9 घरांमध्ये आपले बस्तान बसवले होते. तिथेच त्यांनी दंगलीचे षडयंत्र रचल्याचे म्हटले जाते. 
- पोलिसांचे म्हणणे आहे की अटक करण्यात आलेल्या दिलावरला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे हनीप्रीत आणि आदित्य इन्सा यांच्याबद्दलची खूप माहिती आहे. 
- त्याच्या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे होऊ शकतात. 
 
असे रचले षडयंत्र
- दंगल भडकवण्याच्या षडयंत्राबाबत पोलिसांच्या आधी सीआयडीच्या गुप्तचरांनी रिपोर्ट दिला होता. त्यात म्हटले होते की अखेरच्या सुनावणीसोबतच सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात गुप्त बैठकांचे सत्र सुरु झाले होते. बैठकांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुखांना आणि डेऱ्याच्या खास 11 जणांना पाचारण केले गेले होते. 
- आतापर्यंतच्या तपासात समोर आल्यानुसार राम रहिम 45 सदस्यांच्या समितीमधील फक्त खास 11 जणांनाच बोलावून घेत होता आणि सुनावणीनंतर काय करायचे याचे निर्देश देत होता. 
- या बैठकांना हनीप्रीतही उपस्थित राहात होती. सर्व प्लॅनिंग व्यवस्थित रित्या काम करेल आणि त्यांना वेळोवेळी सुचना देण्याचे काम हनीप्रीतकडे होते. 
- राम रहिमने बोलावलेले 11 लोक हे दुसऱ्या राऊंडमधील 11 जणांना सुचना देत होते. त्यात सांगितले जायचे की बाबा राम रहिमचा आदेश आहे. बैठकीतील सविस्तर माहिती देण्याऐवजी फक्त राम रहिमचा आदेश सांगितला जात होता. 
 
12 वर्षांपासून बाबाचा गनमॅन राहिलेला ओम बुडानियाला अटक 
- राजस्थान पोलिसमधील कमांडो ओम बुडानियाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून तो राम रहीमसोबत त्याचा गनमॅन म्हणून राहात होता. 
- हनुमानगडाचे रहिवासी ओम याला कोर्टाने 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
- तपास पथक बाबाशी संबंधीत 20 मोबाइल नंबरवर नजर ठेवून होते. त्याली काही वारंवार बंद होत होते तर काहींवरुन इंटरनेट कॉलिंग केले जात होते. त्यानंतर हे नंबर बंद होत होते. 
- यापैकी काही नंबर ट्रेस झाल्यानंतर त्यांचे लोकेशन्स राजस्थान असल्याचे कळाले, त्यानुसार एसआयटीने छापा टाकून त्यांना पकडले. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दंगलीच्या आरोपात अटक करण्यात आलेला दिलावर इन्सा...
बातम्या आणखी आहेत...