आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेरा मुख्यालयात सापडली 5 मुले, विना लेबल औषधी, 2 खाेल्याभर नाेटा व प्लास्टिक मनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा/चंदिगड - बलात्कार प्रकरणातील आरोपी गुरमीत राम रहीम यास न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात शुक्रवारी मोठी झडती  मोहीम सुरू झाली. कारवाईप्रसंगी दाेन खाेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड, प्लास्टिक टोकन, संगणकांची हार्ड डिस्क  व इतर साहित्य आढळले. हनीप्रीतच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच ६ हजार  सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी झडती मोहिम पुन्हा सुरू ठेवली जाईल. ही झडती पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सुरू करण्यात आली. यासाठी निवृत्त न्या. ए. के. पवार यांना कोर्ट कमिशनर नियुक्त करण्यात आले आहे.  डेराकडून नेहमी कायद्याचा आदर केला जातो. समर्थकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन डेराचे प्रवक्ता विपासना इन्सा यांनी केले.  

रहस्यमय गुहेचा तपास
न्यायवैद्यक विभागाच्या पथकाने बाबाच्या रहस्यमय गुहेची झडती सुरू केली आहे. राम-रहीम याच गुहेत दुष्कर्म करत होता. येथील सापडलेल्या पाच मुलांना अाता रिमांड होममध्ये पाठवण्यात आले अाहे. 

शस्त्रे, दागिने पळवल्याचा संशय  
९०० एकरांत डेराचा परिसर असून याची पाच सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली. त्यानंतर सर्वत्र कसून झडती मोहीम राबवण्यात येत आहे. प्रत्येक सेक्टरवर पोलिस अधीक्षक दर्जाच्या  अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.  दरम्यान, गृह सचिवांच्या माहितीनुसार या डेऱ्यामध्ये काही स्फाेटके असल्याचा संशय असून त्याचा शाेध घेतल्या जात अाहे. तसेच गुप्त मार्गाने रुपये, साेने, चांदी, शस्त्रे कारवाई पूर्वीच लंपास केल्याचाही संशय व्यक्त केला जाता अाहे.

रस्त्यांची नाकाबंदी , इंटरनेट बंद, काही भागात संचारबंदी
- १९ आयपीएस अधिकारी, निमलष्करी दल आणि पोलिस असे मिळून ७ हजार जवान, ८० वरिष्ठ अधिकारी तसेच श्वानपथकास इतर सुरक्षा व्यवस्थेत तैनात  
- सिरसा जिल्ह्यात मोबाइल, इंटरनेट, एसएमएस आणि डोंगल सेवेवर रविवारपर्यंत प्रतिबंध  
- डेराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले.  
- माध्यमांच्या प्रतिनिधींनाही जाण्यास मज्जाव  
- कारवाईवर ६० कॅमेऱ्यांद्वारे निगराणी  
- शोधपथकातील सर्व कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरास मनाई करण्यात अाली.
- डेरा समर्थकांना मुख्यालयाजवळ न जमा होण्याचे आदेश, १० सप्टेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद. काही भागात संचारबंदी
- हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे टेहळणी 
- खोदकामासाठी १० जेसीबी, ३६ ट्रॅक्टर्स आणि शंभराहून अधिक मजुरांचे काम सुरू. 

सापडलेले साहित्य   
- टीव्ही प्रसारणासाठी लागणारी ओबी व्हॅन आणि वॉकी-टॉकी 
- विना क्रमांकाची लेक्सस कार, कोणतीही ब्रँड, लेबल नसलेली औषधी  
- दोन खोल्या भरून नोटा, संगणक, हार्ड डिस्क आणि मोबाइल 
- मुख्यालयाजवळील बाजारात १० रुपयांपासून वेगवेगळ्या मूल्यांची प्लास्टिकची नाणी  

कर्फ्यूमध्ये सूट नाही 
- सिरसाचे कमिशनर प्रभजोत सिंह यांनी सांगितले, की जोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरु आहे तोपर्यंत कर्फ्यूमध्ये सूट दिली जाणार नाही. 
- सिंह म्हणाले, की सर्च टीमच्या सर्व अधिकाऱ्यांना आपापले काम समजावून सांगण्यात आलेले आहे. 
 
हनीप्रीतची रुम सापडली 
- हरियाणाचे गृह सचिव रामनिवास म्हणाले, सर्च ऑपरेशन दरम्यान राम रहिमची मानस कन्या हनीप्रीतची रुम सापडली आहे. त्या रुममधून मोठ्या प्रमाणात लक्झरी सामान सापडले आहे. 
भूयार शोधण्यासाठी स्पेशल टीम पाचारण 
- तपास अधिकाऱ्यांना शंका आहे की बाबा भूयारी मार्गाने महत्त्वाची कागदपत्र बाहेर पाठवू शकतो, हे लक्षात घेऊन भूयारी मार्ग शोधण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. 
 
सर्च ऑपरेशनची जबाबदीर यांच्याकडे
सरकारने सर्च ऑपरेशनची महत्तवाची जबाबदारी हिसार रेंजचे आयजी अमिताभ ढिल्लो आणि सिरसाचे कलेक्टर प्रभज्योत सिंह यांच्याकडे दिली आहे. याशिवाय एसपी अश्विन शैणवी यांच्यासोबत वीरेंद्र वीज आणि दीपक गहलावत हे दोन आयपीएस टीममध्ये आहे.

कागदावर तयारी चोख
डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने ऑन पेपर मोठा होमवर्क केला आहे. सर्च ऑपरेशनसाठी डेऱ्याची सॅटेलाइट इमेज काढण्यात आली आहे. यामुळे आश्रमाला विविध भागांमध्ये विभागण्यात आले आहे. यानुसारच सर्च ऑपरेशन केले जाणार आहे. या माहितीच्या आधारेच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
कोणत्या प्रकरणात राम रहिमला शिक्षा
- 2002 मध्ये एका साध्वीने निनावी चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने डेऱ्यात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केला होता. 
- तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना लिहिलेल्या या पत्राची एक प्रत पंजाब-हरियाणा हायकोर्टाला पाठवण्यात आली होती. यामध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमवर आरोप करण्यात आला होता. 
- पत्र हायकोर्टात पोहोचल्यानंतर डेरा प्रमुखाविरोधात लैंगिक शोषणाचा खटला सुरु झाला होता. तपास सीबीआयला देण्यात आला. 
- 15 वर्षानंतर ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआय कोर्टाने राम रहिमला दोषी ठरविले आणि दोन बलात्कारांसाठी प्रत्येकी 10 वर्षांची एका पाठोपाठ शिक्षा भोगण्याचा निर्णय दिला. 
- असे म्हटले जाते की हे पत्र बाबाचा मॅनेजर राहिलेल्या रणजीतसिंहच्या बहिणीने लिहिले होते. 20 वर्षे बाबाची सेवा केलेल्या रणजितचा नंतर खून झाला होता. त्याच्या खूनाचा आरोप बाबाच्या समर्थकांवर आहे. हा खटलाही पंचकुला सीबीआय कोर्टात सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...