Home »National »Other State» Ramrahimcrime Social Media Viral On Honeypreet Whatsapp Number

हनीप्रीतचा मोबाइल नंबर सोशल मीडियावर व्हायरल, हा फोटो आहे WhatsApp डीपी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 11:17 AM IST

  • हनीप्रीतचा मोबाइल नंबर व्हायरल झाल्यानंतर लोक तिला कॉल करत असल्याचे म्हटले जात आहे.
रोहतक- साध्वींवर बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या राम रहिमची कथित मानस कन्या हनीप्रीत सध्या फरार आहे. तिच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत तर सापडली नाही मात्र तिचा मोबाइल नंबर त्यांना मिळाला आहे. सोशल मीडियावर हनीप्रीतचा WhatsApp नंबर व्हायरल झाला आहे.
लोक लावत आहेत हनीप्रीतला वारंवार फोन
- राम रहिमचे काळे कारनामे समोर आल्यानंतर भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने बाबा आणि हनीप्रीतचे सदस्यत्व रद्द केले आहे. या प्रक्रिये दरम्यान असोसिएशनने या दोघांना सदस्यत्व दिले होते ते प्रमाणपत्र समोर आले आहे. यावर हनीप्रीतचा मोबाइल नंबर 86***77 होता. हाच नंबर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हॉट्सअॅपवर आहे बाबाचा डीपी
- हनीप्रीतचा नंबर व्हॉट्सअॅपवर पाहिल्यास त्यावरील डीपीमध्ये राम रहिमचा फोटो आहे. राम रहिम त्याच्या डिस्को अंदाजात बाइकवर बसलेला त्या फोटोमध्ये दिसतो. त्यासोबत हनीप्रीतने व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये At School लिहिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हनीप्रीतचा WhatsApp DP

Next Article

Recommended