आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये मिरवणुकीवर दगडफेक-जाळपोळ, तीन ठार;लागला कर्फ्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारीबागमध्ये मिरवणुकीवर दगडफेक आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. - Divya Marathi
हजारीबागमध्ये मिरवणुकीवर दगडफेक आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली.
हजारीबाग - रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान रविवारी हजारीबाग येथे दोन गटांमध्ये हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली, काही दुकानांना पेटवून देण्यात आले. हिंसाचारात तीन जण मारले गेले. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी गेलेले एक डझन पोलिस कर्मचारी जखमी झाले. सध्या येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून रस्त्यांवर फक्त पोलिस दिसत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्री मिरवणुकीवेळी दोन जणांचा खून झाला होता. त्यांची ओळख पटली आहे, एक प्रिंससिंह तर दुसरा अनुज कुमार आहे.

मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ
- रविवारी हजारीबागमध्ये रामनवमीची मिरवणुक निघाली होती. यादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि गदारोळ माजला.
- अनेक दुकाने आणि घरांना पेटवून देण्यात आले. समाजकंटकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बाइकले पेटवून दिले.
- पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
- याआधी शुक्रवारी देखिल रामनवमीनिमीत्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता.
- दगडफेक आणि जाळपोळीनंतर जिल्हाधिकारी मुकेशकुमार, पोलिस आयुक्त अखिलेश झा, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपेंद्रकुमार रस्त्यावर उतरले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जाळपोळ आणि आग विझवण्याचे फोटो