रांची-
टीम इंडियाचा कूल कॅप्टन
महेंद्रसिंह धोनीवर रांची शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. धोनीने
आपल्या बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून 450 रुपये दंडही वसूल केला.
धोनी सोमवारी (6 एप्रिल) शहरातून आपल्या बुलेटवरून फेरफटका मारताना दिसला होता. बुलेटच्या मडगार्डवर वाहन क्रमांक लिहिला होता. परंतु, धोनीपर्यंत वाहतूक पोलिसांची नजर पोहोचली नाही. मंगळवारी (7 एप्रिल) वृत्तपत्रात धोनीचे बुलेटवरील छायाचित्रे प्रसिद्ध झाले. धोनीच्या बुलेटवर चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावल्याचे आढळून आले. वाहतुकीच्या नियमानुसार गाडीची नंबर प्लेट समोरच्या बाजूला असणे आवश्यक आहे. त्यामुळे धोनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. धोनीच्या घरी दंडाची पावती पाठवून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल केली.
दरम्यान, धोनीने कानात इअरफोन आणि हेल्मेट घातलेले होते. विशेष म्हणजे धोनी ज्या बुलेटवर रांचीच्या रस्त्यावरुन फिरत होता, त्या बुलेटची पासिंग महाराष्ट्रातील होती.
धोनी रांचीतील हरमू भागात राहातो. सोमवारी सकाळी जवळपास सात-आठ वाजेच्या दरम्यान तो बाहेर पडला आणि दहा वाजता परत आला. यावेळी तो सिमलिया येथील फार्महाऊसवर देखील जाऊन आला. फार्महाऊसला जाण्याआधी धोनी बहिणीच्या घरी गेला. तेथे त्याने भाऊजी गौतम गुप्ता यांची भेट घेतली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रांची शहरात हिरव्या बुलेटवरील धोनीचे फोटो...