आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: \'हमर\'ची नोंदणी \'स्कॉर्पियो\' म्हणून करणार्‍या धोनीकडून दंड वसूूल करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमरसोबत धोनी - Divya Marathi
हमरसोबत धोनी
धनबाद/रांची - झारखंड राज्य परिवहन विभागाने 'हमर' कारची 'स्कॉर्पिओ' म्हणून नोंदणी करणारा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून दंड वसूल करण्‍याची तयारी केली आहे. या प्रकरणी धोणीला नोटीसही बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, झारखंडच्या परिवहन विभागाला विदेशातील एसयूव्ही आणि देशात तयार झालेल्या स्कॉर्पियोमधील फरक कळालेला नाही ? परिवहन विभागात महेंद्रसिंह धोनीच्या हमरची नोंदणी स्कॉर्पिओ म्हणून करण्यात आली आहे. यामुळे झारखंड परिवहन विभागाचे तब्ब्ल साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. धोनीचा फायदा करुन देणारा हा घोटाळा नसून नजरचूक असल्याचे आता विभाग म्हणत आहे.
2009 मध्ये धोनीने खरेदी केली होती हमर
- धोनीने 13 मे 2009 ला अमेरिकेची कंपनी जनरल मोटर्सची हेवी एसयूव्ही हमरची खेरदी केली होती.
- त्याने रजिस्ट्रेशनसाठी रांची जिल्हा परिवहन अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता.
- हमरची किंमत होती एक कोटी रुपये. यावर चार टक्के रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाते. म्हणजेच, जवळपास चार लाख रुपये नोंदणी शुल्क भरणे गरजेचे होते.
- मात्र, परिवहन विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये हमरचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी स्कॉर्पिओ लिहिले. यामुळे नोंदणी शुल्क लागले फक्त 53 हजार रुपये.
- आता ही नजरचूक आहे की धोनीचा फायदा करुन देण्यासाठी रांची परिवहन विभागाकडून झालेला घोटाळा याची चर्चा सुरु झाली आहे.
काय व्हायला पाहिजे होते
- रांची विभागीय परिवहन विभागाने केंद्रीय परिवहन विभागाकडून विदेशी गाड्यांची यादी मागवून वेबसाइट आणि रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर अपडेट करायला पाहिजे होते.
- मात्र असे झाले नाही. घाई-गडबडीत 30 ऑक्टोबर 2009 मध्ये धोनीच्या हमरचे रजिस्ट्रेशन करुन मोकळे झाले.
- हमरचा रजिस्ट्रेशन क्रमांक जेएच 01 एबी-7781 असल्याचे सापडले आहे. मात्र मेकर आणि मॉडेल या कॉलममध्ये गाडी स्कॉर्पिओ असल्याची नोंद करण्यात आली.
- मॅन्युफॅक्चर कॉलममध्ये अमेरिकेची कंपनी जनरल मोटर्स ऐवजी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे नाव लिहिले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय लिहिले आहे रजिस्ट्रेशन पेपरवर
बातम्या आणखी आहेत...