आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Laxmi Bai Birthday Special Story On Jhansi Fort

हा आहे झाशीच्या राणीचा 400 वर्षे जुना किल्ला, हजारो तोफ गोळे झेलले आहेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
400 वर्षे जुना झाशीचा किल्ला. - Divya Marathi
400 वर्षे जुना झाशीचा किल्ला.
19 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्‍मीबाई यांचा जन्मदिवस आहे. यानिमित्त divyamarathi.com त्यांच्या वैशिष्‍ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, दैदीप्यमान इतिहास आणि इतर पैलू तुम्हाला सांगणार आहे.
झान्शी : राणी लक्ष्‍मीबाई 1858 मध्‍ये इंग्रजांशी लढता लढता शहीद झाल्या होत्या. त्यांच्या शौर्याची किस्से आजही लोकांमध्‍ये चर्चेचा विषय आहे. याच किस्साचा भाग म्हणजे झाशी येथील लक्ष्‍मीबाईंचा किल्ला होय. या ऐतिहासिक वास्तूत एकेक कोपरा त्यांच्या शौर्यची साक्ष देते. एकाच वेळी इंग्रजांनी किल्ल्यावर 60-60 तोफ गोळे डागले होते. तसेच त्यांनी अनेक वेळेस या वास्तूवर हल्लाही केला होता. या हल्ल्यानंतर आजही राणींचा किल्ला सन्मानाने उभा आहे.
ओरछाचा राजा वीर सिंह देवने 1613 इसवी सनमध्‍ये झाशीचा किल्ला बांधला होता. हा किल्ला बंगरा नावाच्या पर्वतावर उभा आहे. शेकडो वर्षे येथे मराठ्यांचे शासन होते. मात्र आजही शौर्यचे प्रति‍क म्हणून किल्ल्याला राणी लक्ष्‍मीबाई या नावाने ओळखले जाते.
1853 मध्‍ये लक्ष्‍मीबाई बनल्या झान्शीच्या राणी :
वडील शिवरामभाऊ नंतर गंगाधर राव झाशीचा राजा बनला. विवाह झाल्यावर काही महिन्यांनी राणीने एका मुलाला जन्म दिला. परंतु त्याचा अकाली मृत्यू झाला. 1853 मध्‍ये राव यांच्या निधनानंतर लक्ष्‍मीबाई झाशीच्या राणी बनल्या होत्या.

एका वर्षाच्या आत राणीला सोडावा लागला किल्ला :
राजा गंगाधर राव यांच्या निधनापूर्वीच राणीने एका मुलाला दत्तक घेतले होते. मात्र इंग्रजींनी दामोदर राव यांना दत्तक पूत्र मानण्‍यास नकार दिला होता. या कारणामुळे 28 एप्रिल 1854 रोजी राणी लक्ष्‍मीबाई यांना किल्ला सोडावा लागला. त्या ब-याच दिवसापर्यंत 'राणी महाल' मध्‍ये राहिल्या(पूर्वी या ठिकाणास शासकीय निवासस्थान म्हणून संबोधल जात असे. मात्र लक्ष्‍मीबाई येथे राहिल्याने या ठिकाणाला राणी महाल असे नाव पडले.).
1857 मध्‍ये पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला :
राणी लक्ष्‍मीबाईंना बंडखोर सैन्याने आपल्या नेत्या म्हणून मान्य केले. राणीने सैन्याच्या मदतीने इंग्रजांविरुध्‍द युध्‍द पुकारले. यात त्यांनी इंग्रजांना पळवून लावून 12 जून 1857 रोजी लक्ष्‍मीबाईंनी पुन्हा झाशी राज्य आणि किल्ल्यावर नियंत्रण मिळवले होते.
सर्व छायाचित्रे : राम नरेश यादव.
पुढील स्लाइड्सवर वाचा राणी लक्ष्‍मीबाईंनी केव्हा झान्शी आणि किल्ला सोडण्‍याचा निर्णय घेतला...