आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukherjee In Bhopal And Take Blessings Of Cm Shivraj

शिवराज सिंह चौहान यांच्यात दिसते आईचे रुप, \'मर्दानी\'ने घेतला आशीर्वाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फिल्मोत्सव 2014 कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा आशीर्वाद घेताना अभिनेत्री राणी मुखर्जी)

भोपाळ- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यात मला आईचे रुप दिसते. आजपासून मी शिवराज सिंह चौहान याची भाची असून मध्य प्रदेशची कन्या असल्याचे प्रतिपादन बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी केले. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीने ‍चौहान यांना चरणस्पर्श करून आशीर्वादही घेतला.

भोपाळ येथील रवींद्र भवनमध्ये आयोज‍ित फिल्मोत्सव-2014 चे उद्‍घाटनाप्रसंगी राणी मुखर्जी हिने संबोधित केले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

'मर्दानी'मध्ये हाताळण्यात आलेला विषयातून प्रेरणा घेवून आजीवन समाजासाठी काम करणार असल्याचे राणी मुखर्जीने यावेळी सांगितले. कोरियोग्राफर वैभवी मर्चेंट ही देखील याप्रसंगी उपस्थित होती.

शिवराज सिंह यांना येण्यास विलंब झाल्यामुळे कार्यक्रम उशीरा सुरु झाला. फिल्मोत्सवात ‘मर्दानी’ सिनेमा दाखवण्यात आला. यापूर्वी राणी आणि वैभवीने ट्रायबल म्युझियम पाहिले.

बॉलिवूडमध्ये प्रत्येक क्षणाला संघर्ष...
अभिनेता असो की अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये प्रत्येक क्षणाला संघर्ष सुरुच असतो. आदित्य चोप्रा हे माझे पती आहेत. यासोबत ते एक प्रोड्यूसरही आहे. आदित्य मला त्यांची मैत्रिण समजतात. विवाहानंतरही माझा सिनेमा यशस्वी झाल्याने मी खूप आनंदी आहे. आदित्यच्या रुपात मला स्वप्नातील राजकुमार भेटल्याचे राणी मुखर्जीने सिटी भास्करशी बोलताना सांगितले.

‘फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला पहिला ब्रेक मिळाला तेव्हा अॅक्टिंग करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. परंतु मी अॅक्टिंग करावी, अशी आईची इच्छा होत‍ी. जर आईचे ऐकले नसते तर माझे स्वप्न अपूर्णच राहिले असते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, 'फिल्मोत्सव-2014' आणि राणी मुखर्जीची खास झलक...
(छाया: शान बहादुर)