आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक कुकर्म; संतप्त जमावाकडून एक आरोपी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामलूक- पश्चिम बंगालच्या एका गावात बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कारानंतर हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त नागरिकांनी एका आरोपीला बेदम मारहाण करत ठार केले. अन्य दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पूर्व मिदनापूर जिल्ह्याच्या कालीबाजार गावात ही घटना घडली.

मुलीचा मृतदेह शेतात सापडल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिली. तिच्या वडिलांनी तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुलगी बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. गुरुवारी सकाळी घरापासून जवळच तिचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मुलीच्या घराजवळ राहणारा रतन दास व त्याच्या दोन साथीदारांनी बुधवारी रात्री सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी मुलीचा गळा दाबून खून केला. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर जमावाने तिघांना बेदम चोप दिला. यामध्ये दास याचा रुग्णालयात मृत्यू झाला. 40 ते 50 दरम्यान वय असलेला रतन दास मांत्रिक होता.