आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या पोटदुखीने वाढवली आईची समस्या; तिने कथन केला 7 महिन्यांपूर्वीचा \'तो\' प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांकेर- छत्तीसगडमधील कांकेर येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कायदायक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या आत्याच्या पुतण्याने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल सात महिन्यांनी हा प्रकार तिच्या आई-वडिलांना समजला. मात्र, खूप उशीर झाला आहे. सध्या पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर आहे. आरोपीविरुद्ध भानुप्रतापपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाण्यात दिले गुंगीचे औषध....
- कथित घटना एप्रिल महिन्यात घडली होती. आरोपीने मुलीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता.
- मुलीचे पोट दिवसेंंदिवस मोठे होत होते. सोबतच तिला वेदनाही होत होत्या. आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने झालेला प्रकार सांगितला.
- तिला तातडीने हॉस्पिटलला नेले असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
- पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी‍विरुद्ध बालात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-दुसरीकडे, आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, काय आहे प्रकरण?
बातम्या आणखी आहेत...