आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; अश्लील व्हिडिओही बनवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर/रांची- एका तरुणीवर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्मामाईन्स कैलास नगर पोलिस ठाण्‍याच्या हद्दीत ही घटना काल (गुरुवारी) घडली.

पोलिस सूत्रांनुसार, आरोपी गुरजीत सिंग याने पीडित तरुणीला त्याच्या कारमधून लिफ्ट दिली होती. तरुणी कारमध्ये बसल्यानंतर त्याने तिला कोल्डड्रिंक दिले होते. कोल्डड्रिंकमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकल्या होता. तरुरी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिला काशीडीह येथील स्टुडिओमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिने मानगो पुलावरून खाली उडी घेऊन आत्महत्या करण्‍याचाही प्रयत्न केला होता. परंतु तिला स्थानिक लोकांनी वाचवले आणि साकची पोलिसांच्या दाब्यात दिले.

साकची पोलिसांनी हे प्रकरण वर्मामाईन्स पोलिस ठाण्‍याकडे वर्ग केले. पीडित तरुणीने पोलिसांना आपबीती सांगितली. तिच्या जबानीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला अजून आरोपी गुरजीत सिंह अटक केली आहे. त्याची कार जप्त करण्‍यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे.