आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे हात-पाय बांधून गर्भवती महिलेवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संभल, मुरादाबाद - उत्तर प्रदेशातील बहजोई येथे काही गुंडांनी पतीसमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला. ही महिला आठ महिन्यांची गर्भवती असतानाही नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. महिलेच्या हत्येनंतर हे गुंड घरातील रक्कम, मोबाइल आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. शनिवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपाल ऊर्फ छैनी आणि त्यांची पत्नी इस्लामनगर येथील रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून राहत होते. या दांपत्याचा जडी-बुटी विकण्याचा व्यवसाय होता. शनिवारी रात्री दोन वाजता काही गुंड त्यांच्या झोपडीत घुसले. हत्यारांचा धाक दाखवून त्यांनी छैनी यांचे हात-पाय बांधले. पत्नीवर सामूहिक बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केली.