आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या रेप पीडितेने बालकाला दिला जन्म, त्या रात्री तिच्यासोबत हे झाले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- होशंगाबाद जिल्ह्यातील सिवनी मालवा येथे 15 वर्षीय रेप व्हिक्टिम आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मामाच्या घरी दुसऱ्या गावाला गेल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पोटात गर्भ असल्याची माहिती समोर आली होती. मुलीने दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्याची गावी लग्नात गेली होती मुलगी
पोलिस अधिकारी अशोक वरवडे यांनी सांगितले, की पीडित मुलगी आत्याच्या घरी काही दिवस राहायला आली होती. यावेळी संजय साहू या 30 वर्षीय इसमाने तिच्यावर बलात्कार केला. याची माहिती कुणाला दिली तर जीवे मारेल अशी धमकी संजयने तिला दिली होती. त्यातून पीडिता गर्भवती झाली होती.
पीडितेने हे सांगितले
- मला आई नाही. वडील आणि लहान भावासोबत मी राहते. काही महिन्यांपूर्वी आत्याची घरी गेली होती.
- आत्याच्या गावात एक लग्न होते. मी आत्यासोबत लग्नाला गेली होती.
- रात्रीच्या वेळी सगळे झोपले होते. मला वॉश रुमला जायचे होते.
- वॉश रुम घराच्या मागे होते. मी तेथे गेले. यावेळी संजय तेथेच होता.
- त्याने माझा हात पकडला. माझ्यावर वॉश रुममध्ये बलात्कार केला.
- त्यानंतर त्याने लग्नाच्या दरम्यान अनेकदा रेप केला. कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
- या घटनेनंतर मी घरी आले. काही दिवसांनी मामाच्या घरी गेले. तेव्हा मी गर्भवती असल्याचे समजले.
पुढील स्लाईडवर बघा, रेप व्हिक्टिमने जन्म दिलेल्या गोंडस मुलाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...