आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा उपाध्यक्ष बिहारमध्ये चालवत होता सेक्स रॅकेट? तक्रारीनंतर दिला राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारचे काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रजेश पांडेय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एका तरुणीने त्यांच्या बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच ब्रजेश यांनी राजीनामा दिला आहे. ब्रजेश यांच्यावर कथित आरोप करणारी तरुणी बिहारमधील माजी मंत्र्याची कन्या आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात माजी आयएएस अधिकार्‍याचा मुलगा निखिल प्रियदर्शी हा देखील आरोपी आहे.

ब्रजेश आणि निखिल फरार... 
पीडितेने ब्रजेश पांडेय आणि निखिल प्रियदर्शी यांच्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांत तक्रार दाखल होताच ब्रजेश आणि निखिल फरार झाले आहेत.

काय आहे प्रकरण?
- पीडितेने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 जानेवारीला निखिल आणि ब्रजेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच दोघे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा तिने आरोप केला होता. दोघांनी रॅकेटमध्ये 100 हून जास्त तरुणींना अडकवले आहे. 
- सीआयडी-एसआयटीने याप्रकरणाची चौकशी करून कोर्टात आपला अहवाल सादर केला आहे. कोर्टाने पीडितेच्या जबाबावरून ब्रजेशविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत. 
- एसआयटीने ब्रजेशच्या घरावर छापा टाकला. मात्र, ब्रजेश फरार आहे. 
- पीडितेने निखिलच्या कुटुंबियांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. मात्र, कोर्टाने ही तक्रार फेटाळली आहे.

निखिल आणि ब्रजेश दोघे चालवत होते गोरखधंदा... 
- पीडितेने सांगितले की, ब्रजेश आणि निखिल दोघे मित्र आहेत. सेक्स रॅकेटसाठी दोघे एकमेकांना मदत करत हते.  
- या प्रकरणात पदादिकार्‍याचे नाव समोर आल्याने काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. ब्रजेशवर कठोर कारवाई करण्‍याची विरोधकांनी मागणी केली आहे. 
- काँग्रेसचे प्रवक्ते हरखू झा यांनी सांगितले, प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक चौधरी यांनी ब्रजेश पांडेय यांचा राजीनामा स्विकारला आहे.

ब्रजेशने दिले स्पष्‍टीकरण... 
- ब्रजेश पांडेय यांनी राजीनाम्यात म्हटले की, ' गंभीर आरोप करून या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा कट रचण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. तिने ऑन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब नोंदवला आहे. त्यात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. तसेच एफआयआरमध्येही माझे नाव नाही.' 
- पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिल्याचे ब्रजेश यांनी म्हटले आहे.

कोण आहे ब्रजेश पांडेय?
- ब्रजेश पांडेय यांनी 2015 मध्ये गोविंदगंज मधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र,  त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

निखिल करत होता पीडितेला टॉर्चर...
- पीडितेने मीडिया सांगितले की, 'निखिल आणि त्याची फॅमिली आपल्याला टॉर्चर करत होते. निखिलची ओळख बड्या लोकांपर्यंत आहे. 
- पोलिसांनी निखिलचे कार शोरुम सील केले आहे. निखिल त्याच ठिकाणाहून सेक्स रॅकेट चालवत होता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...