आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Victim Suicide After Her Obscene Mms Leaked

बलात्काराचा MMS लीक झाल्यानंतर आशा वर्करची आत्महत्या, दोन समाजात तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - बलात्काराचा एमएमएस लीक झाल्यानंतर एका आशा वर्करने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर छपरा भागात तणावाचे वातावरण आहे. प्रकरण दोन समाजातील असल्यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

डिलिव्हरीच्या बहाण्याने बोलावले, गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार
आशा वर्करला बाळांतपणाच्या बाहाण्याने घरी बोलवले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री घडली. आरोपी शाहिबने आशा वर्करला एका महिलेची डिलेव्हरी करायची आहे, असे सांगून घरी नेले होते. येथून आशा वर्करने गर्भवती महिलेला जिल्हा हॉस्पिटलले नेले. हॉस्पिटलमधून गावी परत येताना आरोपीने आशा वर्करला खाद्य पदार्थातून गुंगीचे औषध खाऊ घातले आणि त्यानंतर बलात्कार केला.

धमकीनंतर पीडितेने केली आत्महत्या
- घटनेची वाच्यता केली तर व्हिडिओ व्हारल करण्याची पीडितेला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सर्व अत्याचार तिने तोंड बंद ठेवून सहन केला. दरम्यान, आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. याची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

पोलिस काय म्हणतात
पोलिस अधीक्षक प्रदीप गुप्ता म्हणाले, आशा वर्कर आणि शाहिब यांच्या अनैतिक संबंध होते. पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर कलम 306 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.