आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांनी कठीण केले 12 वर्षीय पीडितेचे जगणे, कुटुंबाला सोडावे लागले गाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबासोबत कोटा येथील आश्रमात राहत आहे पीडित मुलगी. - Divya Marathi
कुटुंबासोबत कोटा येथील आश्रमात राहत आहे पीडित मुलगी.
झालावाड (राजस्थान) - १२ वर्षांच्या या मुलीला अजूनही समजत नाहीये की शेवटी या वयातच एवढे दु:ख, वेदना काय तिला उचलाव्या लागत आहेत. ती इतकी घाबरलेली, एकलकोंडी असते की कुण्या अनोळखीला पाहिले तरी ती अस्वस्थ होते. वास्तविक ही कहाणी आहे राजस्थानातील झालावाडमध्ये राहणाऱ्या मिनीचे (इथे नाव बदलले आहे) गेल्या वर्षी तिच्या गावातीलच ४-५ लोकांनी अपहरण करून तिच्यासोबत दुष्कर्म केले होते. आज अनेक वर्षांनंतरही स्थिती अशी आहे की तिला न्याय मिळणे तर दूरच, तिचे आपल्याच गावातील आपल्याच घरात राहणेदेखील मुश्कील झाले आहे. न्यायासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे या दलित कुटुंबासाठी इतके भारी पडले की आता त्यांचे गावात राहणेच अशक्य झाले आहे. सातत्याने येणाऱ्या धमक्यांनंतर पीडित मुलीसह या कुटुंबाने गावातून केव्हाच पलायन केले आहे. पूर्वी आपल्या नातेवाइकांकडे राहिले. आता कोटा येथे एका आश्रमात राहत आहेत.

त्रस्त करणारी आश्यर्चकारक गोष्ट ही आहे की, उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी आणि पीडित कुटुंबाच्या मागणीनंतरही पोलिस त्यांना संरक्षण देण्यास तयार नाहीत. पीडितेचे भाऊ, वडील, मोठी बहीण, आई अलीकडेच कोटा येथील बोरखेडास्थित एका आश्रमात राहत आहेत. पीडितेचा भाऊ ‘भास्कर’ला व्यथा सांगताना म्हणाला की, ५ जून रोजी आरोपी पक्षाचे लोक त्यांच्या घरात घुसले. तसे त्याने जावर येथील पोलिस ठाण्याला फोन लावला तेव्हा तिकडून काॅल रिसिव्ह करणाऱ्यास संपूर्ण घटना सांगितली, तेव्हा तो म्हणाला की, आम्ही तर सांगतो आहोत की या प्रकरणात समझोता करून घ्या. पण तुम्ही ते एेकले नाही. आता भोगा फळे. उच्च न्यायालयाने ३ मे २०१६ रोजी आदेश देताना एडीजी सिव्हिल राइट्स, झालावाड एसपीसह २५ पक्षांना नोटीस बजावताना विचारले की, हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे का सोपवू नये. उच्च न्यायालयाच्या या कठोर आदेशाने पीडित मुलीच्या कुटुंबीयांची न्याय मिळण्याची आशा जागी झाली. पण पोलिसांनी आणि आरोपींनी तडजोड करण्यासाठी धमकावणे सुरू केले.

सर्व आरोपी श्रीमंत घराण्यातील
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, २ जुलै २०१५ रोजी त्यांच्या मुलीचे गावातील ४-५ लोकांनी अपहरण केले. यातील सर्व आरोपी श्रीमंत घराण्यातील आहेत. एक पोलिस जमादारही यांना सामील झाला होता. या प्रकरणाची जावर ठाण्यात तक्रार केली तेव्हा पोलिसांनी मुलीलाच ताब्यात घेतले आणि त्यांना न सांगताच आरोपींना वाचवण्याच्या हेतूने अशी विधाने केली की, ज्याच्या आधारे पोलिसांनी फक्त एकच आरोपी बनवला आणि बलात्काराची गोष्टही नाकारली. ते जेव्हा त्यांच्या पीडित मुलीला भेटले तेव्हा तिने तिच्यावरील आपबीतीच कथन केली.
बातम्या आणखी आहेत...