आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Victims Father Hands Audio Clip Asaram Tried To Buy Out Witness Killed Late

ऑडिओ क्लिप: साक्षीदाराला विकत घेण्याचा आसाराम यांनी केला होता प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम यांच्यावर साक्षीदारांना खरेदी करण्याचा आरोप झाला आहे. ज्या साक्षीदाराला विकत घेण्याचे आसाराम यांनी ठरविले होते, त्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आसाराम साक्षीदारांना खरेदी करत असल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी पोलिसांना 15 मिनिटांची ऑडिओ क्लिप दिली आहे. त्यात जोधपुर बलात्कार प्रकरणी आसाराम आणि साक्षीदार कृपालसिंह यांच्यात बोलणे झाले आहे. त्यासोबतच पीडितेच्या वडिलांचा दावा आहे, की कृपालसिंहला खरेदी करण्यासाठीच आसाराम त्याच्या संपर्कात होते, मात्र त्याने नकार दिल्यानंतर त्याचा खून करण्यात आला. उल्लेखनिय बाब म्हणजे कृपालवर शाहजहानपूर येथे 10 जुलै रोजी गोळीबार झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आठ महिन्या पूर्वी झाले बोलणे
पीडितेच्या वडिलांचा दावा आहे, की कृपालसिंह यानेच त्यांना ऑडिओ क्लिप दिली होती. कृपालशी आसाराम यांनी आठ महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. मात्र त्याने आसाराम यांचा प्रस्ताव फेटाळला. दोन महिन्यापूर्वीच त्याने त्याचा जबाब कोर्टात नोंदवला आहे.
कसे केले रेकॉर्डिंग
आसाराम यांचे दोन सहकारी - राघव आणि संजय कृपालच्या घरी आले आणि आसाराम यांना तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे सांगितले. संजयने त्याच्या मोबाइल फोनवरुन नंबर डायल केला आणि आसारामसोबत बोलणे करुन दिले. यादरम्यान कृपालने त्याच्या फोनचे साउंड रेकॉर्डिंग सुरु केले होते. कृपालच्या खूनाच्या आरोपात संजय आणि राघव हे दोघे संशयीत आरोपी आहेत.
पोलिस अधीक्षक म्हणाले - तपासाचा भाग होऊ शकते ऑडिओ टेप
शहाजहानपूरचे पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांनी पीडितेच्या वडिलांनी ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'पीडितेच्या वतीने बलात्कार प्रकरणी जेवढे पुरावे देण्यात आले आहेत ते सर्व तपास अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. ऑडिओ क्लिप तपास अधिकाऱ्यांकडे जमा केली आहे. ते त्याची सत्यता पडताळून पाहातील आणि नंतर ती तपासाचा भाग होईल.'

कृपालवर तीन जणांनी केला होता गोळीबार
कृपालसिंहवर 10 जुलै रोजी हल्ला झाला होता. रात्रीच्यावेळी घरी परतत असताना बाईकवरुन आलेल्या तिघांनी कृपालवर मागून गोळ्या झाडल्या होत्या. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती बिघडल्याने बरेलीला हलवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.