आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape With Japanese Tourist Girl In Jaipur Rajasthan News In Marathi

जयपूरमध्ये जपानी पर्यटक तरुणीवर तोतया गाईडकडून बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- 'पिंक सिटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तोतया गाईडने एका जपानी पर्यटक तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जलमहल परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दुदू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 20 वर्षीय जपानी तरुणी भारतात पर्यटनासाठी आली आहे. जयपूरमधील दुदूमध्ये पीडितेची ओळख एका तरुणासोबत झाली. त्याने तिला तो गाईड असल्याचे सांगितले. तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने तिला विविध पर्यटन स्थळे दाखवले. नंतर मोटरसायकलवर बसवून मौजमा बागेत नेले. तिथे शितपेयातून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बिहारमधील गया शहरात एका जपानी महिला पर्यटकावर काही तरुणांनी सामुहीक बलात्कार केला होता. आरोपींनी पीडितेला ते गाईड असल्याचे सांगितले होते.