आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी बाबाची हनीप्रीत या नव्या लूकमध्ये असू शकते, पाहा व्हायरल झालेले हे 10 फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - हरियाणा पोलिस राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची सर्वात खास हनीप्रीतचा शोध घेत आहेत. परंतु, नुकतेच कळले की हनीप्रीत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. ती पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रोज नवनवे गेटअप बदलत आहे. दोन दिवसांपूर्वी अटक झालेल्या बाबाचा चेला प्रदीपने चौकशीत खुलासा केला की हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे.
 
हनीप्रीतने चेंज केला तिचा गेटअप...
- असे सांगितले जात आहे की पोलिसांना चुकवण्यासाठी हनीप्रीत अनेक प्रकारे तिचा गेटअप बदलत आहे.
- सूत्रांनुसार, हनीप्रीतने आपला पूर्ण गेटअप चेंज केलेला आहे. ती कधी बुरख्यामध्ये, तर कधी साडी परिधान करत आहे.
- हनीप्रीतच्या या नव्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- दुसरीकडे अनेकांनी हनीप्रीतला काठमांडूच्या जवळ एका पेट्रोलपंपावर पाहिले आहे.
- हा पेट्रोल पंप नेपाळच्या बिराटनगरमध्ये आहे, जो पंजाबी पेट्रोल टँक या नावाने प्रसिद्ध आहे.
- सूत्रांनुसार, नेपाळ पोलिसांनीही हनीप्रीतच्या अटकेचे आदेश जारी केले आहेत.
- हनीप्रीत तिच्या पर्सनल गाडीने नाही तर टॅक्सीने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
- गुप्तचरांच्या इनपुटनुसार हनीप्रीतसोबत 3 ते 4 जण आणखी आहेत, जे तिची हरतऱ्हेची मदत करत आहेत.
- हे 3 ते 4 लोक हनीप्रीतसाठी सुरक्षित जागा शोधतात आणि काही दिवसांसाठी हनीप्रीत तिथे आश्रय घेते.

नेपाळमध्येही राम रहीमचे अनेक भक्त...
- राम रहीमचे भक्त भारताशिवाय अनेक देशांमध्ये आहेत. एकूण भक्तांची संख्या 5 कोटी असल्याची माहिती आहे.
- बाबाच्या भक्तांची संख्या नेपाळमध्ये सर्वात जास्त आहे. या कारणाने असे मानले जात आहे की, हनीप्रीत नेपाळमध्ये आहे.
- राम रहीमचे हेच भक्त आता हनीप्रीतची मदत करत आहेत. तिला लपायला मदत करत आहेत.
- सूत्रांनुसार, राम रहीमने नेपाळमध्ये एक शाळा बांधली होती, यामुळे तेथील लोक बाबाचे भक्त बनले.
 
25 ऑगस्टपासून फरार आहे हनीप्रीत
- हनीप्रीतच्या शोधासाठी  हरियाणा पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी लूक आऊट नोटीस जारी केली होती.
- डेरा सच्चा सौदा प्रमुख बलात्कारी राम रहीमची खास हनीप्रीत 25 ऑगस्टपासून फरार आहे.
- ज्या दिवशी गुरमित राम रहीमला बलात्कारासाठी शिक्षा सुनावण्यात आली होती, त्या दिवशी पंचकुलामध्ये डेरा समर्थकांनी दंगल भडकवली होती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कसे गेटअप बदलून फिरत आहे हनीप्रीत... 
बातम्या आणखी आहेत...