आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raqeebul Alias Ranjeet Says, \'Yes! I Used To Supply Girls\'

LOVE JIHAD चा आरोपी रकीबुलने दिली कबुली, नेते अधिका-यांना पुरवायचा मुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - रकीबुल उर्फ रंजीत कोहली

रांची - राष्ट्रीय पातळीवरील शूटरला फसवून तिच्याशी लग्न केल्याचा आणि नंतर तिला धर्मांतरासाठी दबाव आणण्याच्या प्रकरणातील आरोपी रकीबुल हसन खान उर्फ रंजीत सिंह कोहली याने बड्या हस्तींना मुलींचा पुरवठा करत असल्याचा आरोप मान्य केला आहे. कोठडीदरम्यान पोलिसांच्या तपासात त्याने ही माहिती दिली. त्याने यावेळी काही पोलिस अधिकारी आणि हाय प्रोफाइल लोकांची नावेही पोलिसांना सांगितली.

चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने आधी सांगितलेलीच माहिती सांगायला सुरुवात केली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व काही सांगितले. ताराने केलेल्या आरोपात रकीबुल मंत्र्यांना हॉलेलात घेऊन जायचा असे सांगितले होते. ते त्याने मान्य केले. दरम्यान, रकीबुलची मोलकरीण हरिमतीने पोलिसांना जबाबात तो आणि त्याची आई ताराला मारहाण करायची असे सांगितले आहे.
तारा प्रकरणी सीबीआई चौकशी : सीएम
तारा शाहदेव प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकाने केली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तारा बरोबर चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला आहे. ताराला पुन्हा क्रीडा जगतात परतण्यासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. यात पांढरपेशा लोकांची नावे आल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनल्याचेही सोरेन म्हणाले आहेत.

निकाह प्रक्रिया पूर्ण झालीच नाही : काजी
रंजीत आणि तारा यांच्या निकाहाचा पूर्ण विधीच झाला नसल्याचे काझी कारी जॉन मोहम्मद मुस्तफी म्हणाले. गोधांच्या वडिलांची नावे मुस्लीम नव्हती. तसेच दोघांच्या सह्याही नव्हत्या. आठ जुलैला ब्लेयर अपार्टमेंट मध्ये निकाह लावण्यासाठी गेलो होतो. पण दोघांनी वडिलांची नावे सांगितल्यानंतर त्यांना पुढील विधी करण्यास नकार दिल्याचे काझींनी सांगितले.