जालंधर - देशात आज शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त सोशल मीडियावर त्यांनी वापरलेल्या वस्तू शेअर केले जात आहे. यात भगतसिंग यांनी वापरलेले शर्ट, घड्याळ आणि बूट जोडीचा समावेश आहे. या वस्तू त्यांनी
आपला मित्र जयदेवला दिल्याचे सांगितले जाते.
भगतसिंग यांनी विधानसभेत फेकले बॉम्ब...
- भगतसिंग आजही युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. तुरुंगात असताना उपोषण व अटकेची छायाचित्रांबरोबरच त्यांनी लिहिलेले बरेच पत्रही भारत व पाकिस्तानच्या लाहोरच्या वेगवेगळ्या भागात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
- त्यांच्या जयंतीनिमित्त हे सर्व वस्तू सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात बॉम्ब शेलचाही समावेश आहे. हे सीआयडी लाहोरने जप्त केले होते. नंतर दिल्ली विधानसभा बॉम्ब स्फोट प्रकरणात याचा पूरावा म्हणून वापर करण्यात आला होता.
- व्हायरल होत असलेल्या वस्तूंमध्ये भगतसिंग यांचे एक फुल स्लीव इटालियन कॉलर असलेली खाकी शर्ट व घड्याळाचाही समावेश आहे.
पाकिस्तानमध्ये आहे शहीदाचे जन्मस्थळ
- क्रांतीकारकांमध्ये आघाडीवर असलेले शहीद भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर, 1907 रोजी फैसलाबाद जिल्ह्याच्या (आता पाकिस्तानमध्ये) जरांवाला तालुक्यातील बंगा गावात झाला होता.
- त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या धैर्याने इंग्रजांशी दोन हात केले तो एक आदर्श नमुना आहे. देशाला जागृत करणे व इंग्रजी शासकांपर्यंत आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी आपल्या साथीदारांसोबत विधानसभेत बॉम्ब फेकले.
- बॉम्ब फेकल्यानंतर ते पळून जाऊ शकत होते. मात्र त्यांनी असे केले नाही. असे त्यांनी देशातील इंग्रजी शासन उलथून टाकण्यासाठी केले.
- बॉम्ब जीवित हानी करण्यासाठी फेकण्यात आले नव्हते. बॉम्ब फार शक्तिशाली नव्हता.
- नंतर 23 मार्च 1931 रोजी दोन सहकारी राजगुरु व सुखदेवसोबत फाशीवर लटकवण्यात आले होते. त्यांच्या हुतात्म्यामुळे इंग्रजांविरोधात अनेक युवकांना उभे केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा शहीद भगतसिंग यांच्या वस्तूंची छायाचित्रे...