आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata’s Message To Bengal: Look What Modi Has Done

टाटांच्या सल्ल्याने तृणमूल संतप्त, अमित मित्रा म्हणाले टाटा मानसिक रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता : रतन टाटांनी राज्यातील औद्योगिकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते बहुधा मानसिक आजाराने ग्रस्त असावेत, त्यामुळेच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचे मित्रा म्हणाले आहेत.
त्याआधी बुधवारी टाटांनी पश्चिम बंगालसंदर्भात आपले मत मांडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कोलाकात्याचा लंडनप्रमाणे विकास करण्याचे आश्वासन दिले होते. पण शक्य नाही, असे टाटा म्हणाले होते. राज्यात कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास झालेला पाहायला मिळत नाही, तसे संकेतही नाहीत. त्याउलट मोदींनी गुजरातचा जो कायापालट केला, त्यातून धडा घेण्याचा सल्ला टाटा यांनी दिला होता.
एका कार्यक्रमानिमित्त कोलाकात्याला आले असता टाटा यांनी आपली परखड मते मांडली. टाटांना यावेळी जीवनातील एक सुखद आणि एक दुःखद घटना विचारण्यात आली होती. त्यावर पुण्यातील कामगारांच्या मुद्यातून सावरत असतानाच सिंगूरचा वाद समोर उभा राहिल्याचे ते म्हणाले. हा सर्वात मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला संपूर्ण कारखानाच दुस-या ठिकाणी हलवावा लागणार होता. त्यात मोठा धोका होता. आम्ही सुमारे तीन लाख नॅनोसाठी ऑर्डर घेतलेली होती. ग्राहकांनी पूर्ण रक्कमही भरलेली होती. त्यामुळे आमच्यावर मोठा दबाव होता. या सर्व वादात उत्पादनात एक वर्ष विलंब झाला. त्यामुळे उत्साह मावळत गेला व एकूणच सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम झाला, असे टाटांनी सांगितले. यानंतर गुरुवारी अमित मित्रा यांनी टाटांच्या विरोधात वक्तव्य केले.
काय म्हणाले मित्रा?
रतन टाटांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत असावा. आजुबाजुला काय घडते आहे, हे त्यांना कळत नाही, असे मला वाटते. टाटा समुहातील कंपनी असणारी टीसीएस येथे सुमारे 20,000 रोजगारांची निर्मिती करत आहे. तसेच अंबानी आणि इमामी ग्रुप येथे सिमेंट उद्योग उभारण्याच्या तयारीत आहेत, असे मित्रा यांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइडवर वाचा - टाटा म्हणाले सर्वांनी मोदींकडून ध़डा घ्यावा...