आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१० हजारपेक्षा कमी पेमेंट असणाऱ्यांना बँक मागणार नाही यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घरी लग्न असलेल्या आणि नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबांना आरबीआयने थोडा दिलासा दिला आहे. ज्यांना १० हजारपेक्षा कमी पेमेंट करायचे आहे त्यांना बँका आता लोकांची यादी मागणार नाहीत. बँक खाते नसल्याबाबतचे डिक्लेरेशनही द्यावे लागणार नाही. आरबीआयने सोमवारीच लग्नासाठी एकाच वेळी अडीच लाख रुपये काढण्यास सूट दिली होती. पण त्यासाठी कठोर अटीही होत्या. रोख पेमेंट मिळणाऱ्यांकडून डिक्लेरेशन घेतले जावे, अशीही एक अट त्यात होती. कोणत्याही बँकेत आपले खाते नाही, असे त्यात लिहून द्यावे लागणार होते. मात्र, लहानसहान खर्चासाठीही डिक्लेरेशन मागणे अव्यवहार्य आहे, असे म्हणून त्यावर टीका सुरू झाली होती. त्यामुळे आरबीआयने नियम बदलून १० हजारापर्यंतचे पेमेंट मिळणाऱ्यांकडून डिक्लेरेशन घेण्याची अट हटवली.
बातम्या आणखी आहेत...