आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reachest MLA Of Rajasthan Kamini Jindal Support Arvind Kejriwal

197 कोटींच्या मालकिन आहेत या आमदारबाई, केजरीवाल यांना पाठिंबा देऊन आल्या चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - दिल्लीमध्ये आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी राजस्थानमधील एक अब्जाधीश आमदार कामिनी जिंदाल यांनी आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी दिल्लीतील एका वृत्तपत्रात जाहीरात देऊन पाठिंबा दिला. त्यात म्हटले आहे, की दिल्लीत बदल हवा आहे.
कामिनी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील आमदार आहेत. 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्या चर्चेत येण्याचे कारण त्यांची संपत्ती होती. त्यांना धनकुबेर देखील म्हटले जात होते. कामिनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती ही तेव्हा निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या 400 उमेदवारांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त होती. चला तर जाणून घेऊया, कोण आहेत कामिनी जिंदाल...
कामिनी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांनी सर्वात कमी वयात सर्वाधिक मतांनी विजय होण्याचा विक्रम रचला आहे. त्यासोबतच सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या क्रमवारीत त्या अव्वल स्थानी आहेत. कामिनी जिंदाल या जमींदारा पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि तत्कालिन आमदार राधेश्याम यांचा 37 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. या विजयासह त्या या मतदारसंघातून विजयी झालेल्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी राजस्थानच्या सर्व 200 आमदारांना मागे टाकले आहे. त्या 197 कोटींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत. एवढेच नाही तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या संपत्तीपेक्षा कामिनी यांची संपत्ती 50 पटीने जास्त आहे. 2013 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीवेळी वसुंधरा राजे यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती चार कोटी रुपये होती.
कामिनी यांची संपत्ती 197 कोटी, तर आईची संपत्ती 2,762 कोटी रुपये
विधानसभा निवडणुकीवेळी कामिनी जिंदाल यांनी जाहीर केल्यानुसार त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 197 कोटी रुपये होती, तर त्यांची आई बिमला देवी यांची मालमत्ता 2,762 कोटी रुपये होती. यातील 1,558 कोटी रुपये ही त्यांचे वडील बी.डी. अग्रवाल यांची आहे. बी.डी.अग्रवाल हे हरियाणातील सिवानी येथील शेतकरी कुटुंबाशी संबंधीत आहेत.
आयपीएससोबत केले लग्न
कामिनी या वडील अध्यक्ष असलेल्या जमींदारा पक्षाच्या आमदार आहेत. तर जयपूर येथे पोस्टींग असलेले आयपीएस गगनदीप जिंदल यांच्या पत्नी आहेत. गगनदीप यांच्याकडे 19.52 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. कामिनी यांनी बीए आणि नंतर मास्टर डिग्री तत्वज्ञान विषयात संपादन केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घेऊ या कामिनी यांच्याबद्दलचा रोचक गोष्टी आणि त्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीविषयी
टीप - पुढील स्लाइडमध्ये संग्रहित छायाचित्रांचा वापर करण्यात आलेला आहे