आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reaction On Social Media After Declaration Of Padma Awards

#padmaaward4bhakts ट्रेंडींगमध्ये, अनुपम खेर नेटिझन्सच्या निशाण्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुपम खेर यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर यूझर्सनी त्यांचे दोन ट्विट पोस्ट केले. त्यापैकी पहिले ट्विट 2010 चे आहे. त्याममध्ये त्यांनी पद्म पुरस्कारांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. तर दुसरे ट्विट सोमवारचे आहे. त्यात केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. - Divya Marathi
अनुपम खेर यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा केल्यानंतर ट्विटरवर यूझर्सनी त्यांचे दोन ट्विट पोस्ट केले. त्यापैकी पहिले ट्विट 2010 चे आहे. त्याममध्ये त्यांनी पद्म पुरस्कारांवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. तर दुसरे ट्विट सोमवारचे आहे. त्यात केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली - सोमवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर पद्मभूषण मिळालेले अनुपमखेर नेटीझन्सच्या निशाण्यावर आले. त्यांच्या पुरस्कारासाठी निवडीचा संबंध पुरस्कार वापसीच्या विरोधातील त्यांनी काढलेल्या मार्चशी संबंध जोडण्यात आला.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया...
- विनोद राय यांना पुरस्कार मिळाला कारण त्यांनी 2जी घोटाळ्यात झिरो नॅशनल लॉसची हवा काढण्याचे महत्त्वाचे काम केले होते. - ‏@vinaydokania
- जगमोहन यांना पुरस्कार कशासाठी मिळाला, काश्मिरी पंडितांना बाहेर काढण्यााठी? - @vikeel_reddy
- अंबानी मोदींचे नीकटवर्तीय होते. अजय देवगणने भाजपसाठी प्रचार केला आहे. उदित नारायणनेच ‘अच्छे दिन आने वाले हैं’ गायले होते. - @retheeshraj10
- #PadmaAward4Bhakts च्या यादीत अनुपम खेर टॉपवर आहेत. त्यांच्या मार्च फॉर टॉलरन्समध्ये नागरिकांनी एका पत्रकाराचाही अपमान केला होता. आता सरकारने त्यांचा गौरव केला आहे. - @ravinitesh
- अनुपम खेर यांना त्यांच्या #Tolerance मार्चसाठी पुरस्कार मिळाला आहे का? - @iambeingkunal
- नरेंद्र मोदी कश्मिरी पंडितांच्या अडचणी सोडवू शकले नाही, तर अनुपम खेर त्यांचा पुरस्कार परत करतील का? - @BilalAhmedNgp

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS