आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ready To Face Consequences On Land Bill: Venkaiah Naidu

भूसंपादनाच्या विधेयकावर आरपारच्या लढाईची तयारी - नायडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - भूसंपादनाच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने विधेयकात योग्य त्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यावर राज्यसभेत कितीही विरोध झाला तरी आम्ही आरपारच्या लढाईसाठी तयार आहोत, अशी ठाम भूमिका संसदीय व्यवहार आणि शहर विकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी घेतली आहे.

भूसंपादनाच्या विधेयकात केंद्र सरकारने आतापर्यंत नऊ तरतुदी केल्या आहेत. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. सर्व संबंधितांचा विचार करूनच आम्ही त्यात नवीन तरतुदी केल्या आहेत. त्यांना (काँग्रेस आणि विरोधी पक्ष) विकास करण्याची गरज नाही. सरकारचे चांगले नाव व्हावे, असे त्यांना वाटत नाही. मला लोकांच्या इच्छेची कल्पना आहे. म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत त्याला पाठिंबा मिळेल. खरे तर भूसंपादन विधेयकावर खुलेपणाने चर्चा होणे अपेक्षित आहे. चर्चेत काही चांगले सल्ले आल्यानंतर आम्ही ते नक्कीच स्वीकारू. एनडीए सरकारला जनतेस दिलेली वचनांची पूर्तता करण्याची घाई आहे. परंतु राज्यसभेत आम्हाला बहुमत नाही. राज्यसभेत विरोधकांनी सरकारच्या या विधेयकाच्या मार्गात अडथळा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

(फोटो : नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य रामचंद्र राव यांचा गौरव करताना वेंकय्या नायडू)