आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Facts Of Uttarakhand: Water In Eyes, Panic Floods

उत्तराखंडातील ऑंखो देखो हाल: डोळ्यांत गंगा, वेदनेचा पूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर/ अहमदाबाद/लुधियाना/भोपाळ/रायपूर- रुद्रप्रयाग ते केदारनाथपर्यंत सर्व ठिकाणी मृत्यूचे तांडव आहे.त्यामध्ये अडकलेलेआयुष्य. मोठ्या युद्धासाठी शेकडो हेलिकॉप्टर आहेत; परंतु मृत्यूशी लढणा-या या जीवांना वाचवण्यासाठी कुणीही नाही. विविध मार्गांवर अडकलेल्या लोकांचे दु:ख,वेदना ‘भास्कर’ने जाणून घेतल्या. त्याचा हा विदारक वृत्तांत...
1 चहुबाजूंना मृतदेह आहेत, त्यामध्ये पाला वेचून खातो आहे
मी गौरीकुंडमध्ये फसलो आहे.मला वाचवा.इथे चहूबाजूला मृतदेहाचा खच पडला आहे आणि त्याठिकाणी पडलेला पालापाचोळा खाऊन गुजराण करतो आहे.परवा हेलिकॉप्टर आले होते.अन्नाची काही पाकिटे टाकली.पण ती थोड्याच लोकांच्या हाती लागली.पावसानंतर उपासमार सुरु झाली आहे .प्रथम लोक,गाड्यांना पालापाचोळ्यासारखे उडून जाताना पाहिले.आता अन्नान दशा होऊन लोकांचा मृत्यू पाहण्याची वेळ येईल.आता गौरी कुंडच्याजवळ गौरी गावात आहे.गावातील एका कुटूंबाने आम्हा 500 लोकांना आश्रय दिला आहे.अन्य घरांमध्येच आहेत.कु णी मदतीसाठी आलेले नाही. एखादे हेलिकॉप्टर येईल व आम्हाला घेऊन जाईल या आशेवर आम्ही सर्वजण हेलिपॅड बनवत आहोत.
या मोबाईलचाही भरवसा नाही. कधीही बंद होईल. आता फोन ठेवतो.
(केदारनाथ यात्रेवर असलेले जालंधरचे रोहित जामवाल यांनी फोनवर कथन केलेली हकिगत.)
घरच्यांना भेटले, अश्रुंचा बांध फुटला
कुटूंबियांना केवळ एकदा अखेरचे पाहण्याची तीव्र इच्छा होती.पावसाच्या एका थेंबाएवढीच आशा उरली होती.आशेचा तोच एक थेंब बनून लष्कराने मदतीचा हात दिला.कुटूंबियांची भेट झाली आणि आनंदाला पारावर राहिला नाही.
गौरीकुंडमधून 5 हजार लोक बेपत्ता
केदारनाथनंतर आता गौरीकुंडमध्ये प्रचंड हानी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे पाच हजार लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यात बहुतांशी यात्रेकरूंना नेण्याचे काम करणा-या हमालांचा समावेश आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांत 62 हजार लोक अडकलेले असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
हवाईदलावर जबाबदारी
उत्तराखंडमधील विनाशाची अचूक कारणे शोधून काढण्याची जबाबदारी सरकारने हवाईदलावर सोपवली आहे. हवाईदलाच्या सी-130 जे सुपर हर्क्यूलिस विमानाने हवाई सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. हे विमान शेकडो किलोमिटरच्या परिघाचे अचूक चित्र टिपण्यात सक्षम आहे.
दहा हजार जवान बचावकार्यात
उत्तराखंडमधील बहुतांश भागांत अशीच परिस्थिती आहे. सरकार मात्र म्हणते की, शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. लष्कर, हवाईदल, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे सुमारे 10 हजार जवान बचावकार्यात जुंपलेले आहेत. हवाईदलाची 24 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर्स लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.


2. ज्या हॉटेलमध्ये झोपलो तेच महापुरात वाहून गेले
पांडुकेश्वरमधील ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो, तेथून 200 मीटर दूर वाहणा-या नदीचे पाणी हॉटेलपर्यंत पोहोचले. रात्री दोन वाजता गोंधळ उडाला. आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात हॉटेलची भिंत हलू लागली. सुरुवातीस भिंत काहीशी कलली व नंतर संपूर्ण हॉटेल वाहून गेले. काहीच शिल्लक राहिले नाही. तहानभूक विसरून गाडीत बसलो. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश सरकारकडून त्यांच्या लोकांना मदत पुरवली जात आहे. कोणी रस्त्यालगत डोंगराच्या खडकाला धरून उभा आहे. कोणी डोंगरावर चढत आहे. जवळपास सर्वच भाविक गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये अडकले आहेत.
बद्रीनाथ यात्रेला गेलेले दांताचे सरपंच बसंत कुमावत । जिल्हा परिषद सदस्य ताराचंद धायल


3 शिट्टीचा इशारा मिळाल्यावर आम्ही डोंगरावर चढत होतो
आम्ही पाच वाहनांतून केदारनाथला जात होतो. हॉटेलमध्ये जागा नसल्यामुळे आम्ही जामोली गावात थांबलो. रात्री हवामान बदलू लागले. धोक्याचा इशारा म्हणून आम्ही शिट्टी वाजवू, त्यानंतर तुम्ही डोंगरावर चढा, असा सल्ला गावक-यांनी आम्हाला दिला होता. एका रात्रीत पाच ते सहा वेळेस शिट्टी वाजवण्यात आली. पाणीपातळी वाढताच लोक शिट्टी वाजवत, त्यानंतर आम्ही मुले, महिला आणि ज्येष्ठांना घेऊन डोंगरावर जात होतो. -राजेश अग्रवाल, अहमदाबाद


4 दरड कोसळताना डोंगराचा आधार घेत रस्ता पार केलाव
केदारनाथ व रुद्रप्रयाग येथे गेलेले रायपूरची चार कुटुंबे सुखरूप परतली आहेत. ब्रह्मपुरी येथील नरोत्तम माहेश्वरी यांनी सांगितले, नदीला आलेला महापूर दिसताच आम्ही बसमधून डोंगराच्या रस्त्याने प्रवास सुरू केला. डोंगराच्या कडेला मी नदीचे रौद्ररूप पाहिले. रस्त्यात अनेक दरडी कोसळल्या, अनेक गाड्या नदीत वाहताना पाहिल्या. हॉटेल, घरे पाण्यात बुडाली होती. नदी अक्षरश: टेकड्यांना वाहून नेत होती, डोंगरांनी तर नदीसमोर गुडघे टेकले होते. बूढापारा येथील अतुल चव्हाण यांनी सांगितले की, आमची बस श्रीनगरहून हृषीकेशकडे जात असताना रस्त्याचा सहा फूट भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे बस थांबवली. बसमधून उतरून डोंगरांचा आधार घेता रस्ता ओलांडला. मग चालकानेही तशाच पद्धतीने गाडी पुढे आणली. त्यापाठोपाठ आणखी काही वाहने तिथून पुढे आली. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण रस्ता वाहून गेला.


वाताहतीची तीन कारणे
मुसळधार पाऊस
उत्तराखंडच्या अनेक भागांना 16 जूनपासून पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नद्यांना आलेल्या पुराने परिसरात होत्याचे नव्हते केले.
ढगफुटी
पावसातच केदारनाथ आणि गौरीकुंड भागात सलग दोन दिवस ढगफुटीच्या घटना घडल्या. यामुळे डोंगराळ भागातही पूर आला. दरडी कोसळल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली.
हिमनदी फुटली
सलगचा पाऊस व ढगफुटीमुळे उंचावरील भागांत हिमनद्या फुटण्याच्याही घटना घडल्या. यामुळे भूस्सखन होऊन घरे व रस्ते उद्ध्वस्त झाले.