आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 दिवसांपूर्वी जयपूरपासून 310 किमी दूर लिहिली गेली होती भन्साळींवरील हल्ल्याची स्क्रीप्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्तौडगडमध्ये सभेत भाषण करणारे राणा, व्यासपीठावर राजपूत नेत्यांसहग जयपूर घराण्याचे सदस्य आणि आमदार दीपा सिंहही दिसत आहेत. - Divya Marathi
चित्तौडगडमध्ये सभेत भाषण करणारे राणा, व्यासपीठावर राजपूत नेत्यांसहग जयपूर घराण्याचे सदस्य आणि आमदार दीपा सिंहही दिसत आहेत.
चित्तोडगड/भोपाळ - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर 27 जानेवारीला जयपूरमध्ये जे काही गडले त्याची स्क्रीप्ट 310 किमी दूर असलेल्या चित्तोडगडमध्ये 33 दिवसांपूर्वी म्हणजे 24 डिसेंबर 2016 रोजीच लिहिली गेली होती.  dainikbhaskar.com ने केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार भन्साळींवर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. या संपूर्ण हल्ल्याचा सूत्रधार हा दुसरा कोणी नसून, खासदार फुलनदेवी हत्याकांडातील आरोपी शेर सिंह राणा हा आहे. राणा त्याठिकाणी जे बोलला होता, ते एका व्हिडीओमध्ये रेकॉर्डही झाले होते. आम्ही याबाबत जेव्हा राणाबरोबर चर्चा केली तेव्हा त्यांच्याच इशाऱ्यावर करणी सेनेने असे केल्याचे, त्यांनी कबूल केले. भन्साळींना अजूनही समजले नाही, तर त्यांच्याबरोबर काहीही घडू शकते असेही राणा म्हणाले. 

शेर सिंह सभेत म्हणाले होते, समजले नाही तर थापड मिळेल.. 
24 डिसेंबर 2016 ला चित्तोडगडमध्ये भन्साळींवर हल्ला करणाऱ्या राजपूत करणी सेनाने जोहर स्वाभिमान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात तिहारमधून फरार होऊन अफगाणिस्तानातून पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थि आणण्याचा दावा करणारे शेर सिंह राणा प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याबरोबर करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी, जयपूर शाही कुटुंबाच्या सदस्य आणि आमदार दिया कुमारीसह राजपूत समाजाचे अनेक मोठे चेहरे होते. चित्तोडमधील सेंती येथील उत्सव वाटिकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संबोधित करताना राणा म्हणाले होते, पद्मावती चित्रपटाबाबत मी मुंबईत निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जर चित्रपटात काहीही चुकीचे असेल तर सहन करणार नाही. आम्ही काही धरणे आंदोलन करणार नाही, तर थेट मुंबईला जाऊन थापड ठेवून देऊ. 

रानी पद्मिनीला कल्पना समजणारे भन्साळी समर्थक : राणा 
चित्तोडमध्ये झालेल्या या सबेत राजपूत क्षत्रिय समाजाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांची नावे आणि फोटो पुढील स्लाइड्सवर पाहता येतील.  दिल्ली हाईकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर राणा यांना 'राजपूत गौरव' म्हणून संबोधत अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले तसेच सभादेखिल झाल्या. 

चित्तौडगडमध्ये भन्साळींच्या ‘पद्मावती’बाबत काय म्हणाले होते राणा 
- जर चित्रपटात राणी पद्मिणी आणि इतिहासापेक्षा वेगळे काही आणि आक्षेपार्ह नसेल तर चित्रपट आम्ही अडवणार नाही. 
- चित्रपट तर माझ्यावरही तयार होतोय. माझ्या पुस्तकावर. 
- जर राणी पद्मिणीचे वास्तविक चरित्र दाखवण्यात आले तर, आम्ही भन्साळींचा सत्कार करू. पण जर काही चुकीचे असेल तर (अपमानास्पद शब्द वापरून) मी तुम्हाला माझ्यासोबत या असे म्हणत नाही. मी आंदोलन करणारा माणूस नाही, मी थेट मुंबईला जाऊन त्याला दोन-चार लगावून देईल. (राणांच्या या घोषणेनंतर टाळ्याही वाजल्या आणि सभेत घोषणाबाजीही झाली.) 
- फक्त डायलॉगबाजी करायची असेल तर करत राहा, पण जर चित्रपट थांबवायचा असेल तर आताच जे करायचे असेल ते करा. नसता मला जाऊन त्याची सोय पाहावी लागेल. 
- चित्रपटांत नेहमी ठाकूर किंवा इतर प्रकारे राजपुतांना खलनायकाप्रमाणे दाखवले जाते, यावरही मी आक्षेप घेतला आहे. 
- निर्मात्यांनी मला सांगितले आहे की, पद्मिनीने स्वाभिमान आणि देशासाठी चांगले कार्य केले आहे. ते त्याचप्रकारे दाखवले जाईल. त्यांनी मला प्रॅक्टीकल रीझनही सांगितले. 
- मलाही वाटते की, असे असेल तर दाखवायलाही हवे. कोणी 100 कोटी खर्च करून चित्रपट तयार करत असेल तर तो थांबणार नाही. 
- राणी असेही म्हणाले की, आम्ही आधी चित्रपट बघू आणि काही गडबड असेल तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. 
- या कार्यक्रमाचे आयोजक लोकेंद्रसिंह कालवी वारंवार असे सांगत होते की, पद्मावती चित्रपट तयार झाला तरी तो चालू दिला जाणार नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, तिहारमधून फरार झाला, अफगाणिस्तानातून आणल्या पृथ्वीराज चौहानांच्या अस्थि...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)