आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत झाशीच्या राणीचे 5 व्हायरल फोटोज, जाणून घ्या यांचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झांशी - बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनोट चित्रपट मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशीमध्ये राणी लक्ष्मीबाईची भूमिका करत आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू झालेली आहे. 19 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाईंची जयंती असल्याने DivyaMarathi.Com राणीच्या शौर्याचे किस्से आणि कहाण्यांसोबतच त्यांच्याशी निगडित अशा फोटोजचे सत्य सांगत आहे, जे खरे असल्याचा दावा केला जातो.

 

द वंडरिंग ऑफ इंडिया पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घ्या कशी दिसत होती झाशीची राणी
- जॉनने लिहिलेले पुस्तक "द वंडरिंग ऑफ इंडिया"मध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की,  "महाराणी सर्वसाधारण उंची, स्वस्थ, जास्त जाड नाही, कमी वयात खूप सुंदर दिसणाऱ्या, गोल चेहऱ्याच्या व प्रभावशाली होत्या. डोळे विशेषकरून सुंदर आणि नाकाचा आकार अत्यंत नाजूक. रंग गोरा नाही, परंतु खूप काळाही नाही. कानांमधील कर्णफुलाशिवाय इतर कोणतेही आभूषण नाही. शूभ्र मलमल खूप घट्ट परिधान केलेली होती आणि या वस्त्राचे शिवणकाम खूप चांगले केलेले होते. या परिधानात त्यांच्या शरीराकृतीचे रेखांकन खूप स्पष्ट होते. त्या खूप सुंदर होत्या."


हे आहे झाशीच्या राणीचे व्हायरल फोटोज आणि त्यांचे सत्य...

 

फोटो : 1
या फोटोत त्या आपले केस मोकळे सोडलेल्या आणि कपाळावर बिंदी लावलेल्या दिसत आहेत. याबाबत म्हटले जाते की 159 वर्षांपूर्वी इंग्रज फोटोग्राफर हाफमेनने हा फोटो घेतला होता. आता हा फोटो अहमदाबादच्या एका संग्राहकाकडे आहे. याला भोपाळच्या एका प्रदर्शनातही ठेवण्यात आले होते. यानंतर काही मीडिया हाऊसेसनी याला प्रसिद्धी दिली.

 

सत्य :
लेखक/इतिहासकार जानकीशरण वर्मा म्हणाले, हा फोटो झांशीच्या राणीचा खरा फोटो नाही. या फोटोतील महिलेचे केस मोकळे सोडलेले आहेत, शृंगार केलेला आहे. राणीने कधीही असा फोटो काढल्याचा उल्लेख कुठेही नाही. हा आणखी कुणाचा फोटो असून तो राणीचा असल्याचे सांगण्यात आले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, झांशीच्या राणी व्हायरल फोटोज व त्यांचे सत्य...

बातम्या आणखी आहेत...