आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Reason Of Bypoll Defate Is Failure Of Modi Government Says Bjp MP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP खासदार म्हणाले, मोदी सरकारने आश्वासने पूर्ण न केल्याने पोटनिवडणुकांत फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : छत्‍तीसगडचे राज्‍यसभेतील भाजप खासदरा नंद कुमार साय.

रायपूर - उत्‍तर प्रदेश आणि गुजरातसह 10 राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या खालावलेल्या कामगिरीसाठी एका भाजप खासदाराने मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. छत्‍तीसगडचे राज्यसभेतील खासदार नंद कुमार साय म्हणाले की, सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले असून जनतेला दिलेली आश्वासनेही सरकारला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे लोकांनी असा कौल दिल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचंबरोबर त्यांनी सरकारला कामकाजात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. मात्र, नंतर एका मुलाखतीत त्यांनी असे वक्तव्य केलेच नसल्याचे म्हटले.
अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश
साय गुरुवारी बिलासपूरमध्ये म्हणाले की, महागाई कमी होऊ शकलेली नाही. तसेच इतरही अनेक आश्वासने पाळलेली नाहीत. जनतेला अनेक अपेक्षा होत्या. पण कदाचित त्या सरकारला पूर्ण करता आल्या नसल्याने, लोकांनी धडा शिकवण्याचासाठी मतदान केले नसावे.

जनतेने आरसा दाखवला
छत्‍तीसगड विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी सांभाळलेले नंदकुमार साय म्हणाले की, आपण सर्व काही केले असून ते लोकांना मान्य आहे, असा विचार कधीही करू नये. जर जनतेने तुम्हाला विजयी केले असेल तर सरकारच्या कामाचा आढावाही लोक घेत असतात. पोटनिवडणुकांच्या निकालावरून ते स्पष्ट होते. पण भाजपच्या कामगिरीमुळे मोदींची जादू ओसरली असल्याचा अंदाज लावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान काही वेळानंतर मात्र त्यांनी वक्तव्यावरून यू टर्न घेतला.