आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: गतवर्षी औरंगाबादेत असे झाले अग्नितांडव; पाहा अग्निकांडाचे 30 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारी पहाटे ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये फटाका मार्केटला आग लागली. यात 50 दुकाने जळून खाक झाली. तथापि, याहून मोठे अग्नितांडव गतवर्षी औरंगाबादेत घडले होते. गतवर्षी फटाका मार्केटला आग लागून जवळपास 150 दुकाने बेचिराख झाली होती. DivyaMarathi.com ही घटना रिकॉल करत आहे....
 
असे घडले होते अग्नितांडव
या आगीत १४० दुकानांसह ८८ दुचाकी, १३ चारचाकी खाक झाल्या होत्या. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. एकूण १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज तेव्हा व्यक्त करण्यात आला होता.. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप दुकानदारांनी केला होता, तर प्रत्यक्षदर्शींनुसार शेजारी फुटलेल्या फटाक्याची ठिणगी पडली आणि आग भडकली होती. 
दरम्यान, याप्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबितही करण्यात आले होते. तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली होती.
 
कशी लागली होती आग?
४६ क्रमांकाच्या दुकानात पहिली ठिणगी पडताच त्या दुकानदाराने तेथून पळ काढला. ते पाहून इतर दुकानदार, ग्राहक पळत सुटले. त्यामुळे गोंधळ उडाला. दुकानदार, लोकांनी अग्निशमन दलाला फोन केल्यावर १५-२० मिनिटांनी बंब पोहोचले. तोपर्यंत बाजाराला आगीने वेढले होते. रात्री उशिरापर्यंत दुकाने, जळालेल्या वाहनांचे पंचनामे सुरू होते.
 
अग्निशामक दलाची बेफिकिरी नडली
२६ वर्षांपासून औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद मैदानावर फटका बाजार भरतो. यंदा १७९ जणांनी अर्ज केले होते. १४० जणांनीच दुकाने सुरू केली होती. फटाका विक्रेता संघटनेने मनपा, पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रही घेतले होते. त्यानुसार मैदानावर अग्निशमन दलाचे दोन बंब ठेवणे अत्यावश्यक होते. प्रत्यक्षात तेथे एकही बंब नव्हता.
 
हेही जरूर वाचा
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, गतवर्षीच्या भीषण अग्निकांडाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...